जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या पुढाकारातून पनवेल तालुक्यातील "स्नेहकुंज" वृध्दाश्रमातील अपंग व जेष्ठ नागरिकांच्या लसीकरणास प्रारंभ

 


अलिबाग,जि.रायगड,दि.10 (जिमाका):- जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी रायगड जिल्हयामधील सर्व वृध्दाश्रम, आदिवासी, अपंग, अंथरुणात असलेले रुग्ण, अशा सर्वांचे लसीकरण प्राधान्याने करण्याबाबत सर्व तहसिलदार, गट विकास अधिकारी, प्रकल्प अधिकारी आदिवासी विकास, मुख्याधिकारी नगरपरिषद यांना आदेशित केले होते. 

               त्यानुषंगाने या लसीकरण मोहिमेस पनवेल तालुक्यामधून सुरुवात झाली असून दि. 09 जून रोजी "स्नेहकुंज आधारगृह" नेरे येथील 20 वयोवृध्द व अपंग नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. 

            ज्या नागरिकांकडे पुरावे नाहीत त्यांचे आधारकार्ड तयार करण्याचे कामही प्राधान्याने  सुरु करण्यात आले आहे.  लसींची उपलब्धता ज्या प्रमाणात होईल त्याप्रमाणे पनवेल तालुक्यामधील उर्वरीत 12 आश्रमातील सर्व लोकांचे लसीकरण सर्व शासकीय यंत्रणांच्या समन्वयातून प्राधान्याने करण्यात येणार आहे, अशी माहिती पनवेल तहसिलदार श्री.विजय तळेकर यांनी दिली आहे.

             या मोहिमेसाठी सामाजिक जाणीवेतून हिंदाल्को कंपनी, तळोजा व "स्नेहकुंज" आधारगृहाच्या संचालिका श्रीमती संगिता जोशी व नितीन जोशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक