क्रीडा प्रबोधिनी प्रवेश चाचणी: विभागस्तरावर चाचण्यांचे वेळापत्रक

अलिबाग,दि.04,(जिमाका)-  क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या अधिपत्याखालील शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत राज्यातील 11 क्रीडा प्रबोधिनीमध्ये  विविध क्रीडा प्रकारांसाठी प्रवेश देण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंची निवड कौशल्य चाचण्यांद्वारे प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेश चाचण्या विभागनिहाय घेण्यात येणार असून त्यांचे वेळापत्रक याप्रमाणे-
या चाचण्यात  ॲथलेटिक्स्,जलतरण,जिम्नॅस्टिक, ट्रायथलॉन, ज्युदो, बॉक्सिंग, सायकलिंग, कुस्ती, हॉकी, फुटबॉल,हँडबॉल,आर्चरी,बॅडमिंटन,टेबल टेनिस,शुटींग, वेटलिफ्टिंग या खेळांच्या कौशल्य चाचण्या घेतल्या जाणार आहेत.
कौशल्य चाचण्यांचा कार्यक्रम  विभागनिहाय  याप्रमाणे-
नागपूर- दि.5 ते 6, ठिकाण-विभागीय क्रीडा संकुल नागपूर,
अमरावती- दि.7 ते 8, ठिकाण-विभागीय क्रीडा संकुल अमरावती,
लातुर- दि.10 ते 11 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल लातूर,
औरंगाबाद- दि.12 ते 13 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल,औरंगाबाद,
नाशिक- दि.14 ते 15 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल नाशिक,
मुंबई-दि.17 ते 18 , ठिकाण- विभागीय क्रीडा संकुल धारावी, मुंबई,
पुणे-दि.19 ते 20. ठिकाण -शिवछत्रपती क्रीडापीठ, म्हाळुंगे बालेवाडी पुणे.

क्रीडा प्रबोधिनीत प्रवेशासाठी  महाराष्ट्राचे रहिवासी असलेले व राज्यस्तरावरील स्पर्धेत सहभागी झालेले 19 वर्षे वयाच्या आतील खेळाड हे प्रवेश प्रक्रियेसाठी पात्र असतील. पात्र खेळाडूंनी  विभागनिहाय आवश्यक प्रमाणपत्रांसह  नियोजित ठिकाणी सकाळी 8 वा.  चाचणीसाठी उपस्थित रहावे. रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक