पंतप्रधान पिक विमा योजना: शेतकऱ्यांना सहभागाचे आवाहन

अलिबाग,दि.03,(जिमाका):-खरीप हंगाम 2017-18 साठी जिल्ह्यात पंतप्रधान पिक विमा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी 31 जुलै ही अंतिम मुदत आहे. शेतकऱ्यांनी आपल्या आर्थिक सुरक्षिततेसाठी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी  यांनी केले आहे.
या योजनेत सहभाग कर्जदार शेतकऱ्यांना योजना बंधनकारक असून बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. खातेदारांव्यतिरिक्त कुळांसाठी सुद्धा ही योजना खुली आहे. विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के व रब्बी हंगाम दीड टक्के व नगदी पिकांसाठी 5 टक्के अशी मर्यादा ठेवण्यात आली आहे.पंतप्रधान पिक विमा योजना रायगड जिल्ह्यात भारतीय कृषी विमा कंपनी मार्फत राबविण्यात येणार आहे.या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके,गळीत धान्य् पिके व वार्षिक व्यापारी पिके, वार्षिक फळपिके या पिकांचा समावेशही रायगड जिल्ह्यासाठी करण्यात आला आहे. या  योजनेअंतर्गत पिक  पेरणी पासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात नैसर्गिक आपत्ती व किड रोग यामुळे येणारी घट, अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण देय राहील.
तसेच चक्रीवादळ,अवेळी पाऊस यामुळे कापणी,काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांचे नुकसान झाल्यास वैयक्तिकस्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई निश्चित केली जाईल. सदरचे नुकसान काढणी,कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पात्र राहील. येाजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतला आहे त्या संबंधित वित्तीय संस्थेस किंवा संबंधित विमा कंपनीस कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून 48 तासांचे आत नुकसानग्रस्त् अधिसूचित पिकाची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे.

या योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक असणारे शेतकऱ्यांने भरावयाचे विमा प्रस्ताव पत्र कृषि विभागामार्फत पुरविले जाणार असून सर्व इच्छुक बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी आपल्या गावंत कार्यरत असलेले कृषी सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी पांडुरंग  शिगेदार यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक