अनुकंपा प्रतीक्षा यादी प्रसिद्ध
अलिबाग दि.6 (जिमाका):- गट क व ड संवर्गातील सामायिक अनुकंपा प्रतिक्षा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या
उमेदवारांची प्रतिक्षा यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नोटीसबोर्डवर, नियुक्ती प्राधिकारी
यांच्या कार्यालयात तसेच
www.raigad.gov.in या जिल्हा संकेतस्थळावर
प्रसिद्ध करण्यात आली आहे.या प्रतिक्षा यादीतील नाव व क्रमांकाबाबत उमेदवारांची कोणतीही
हरकत,आक्षेप असल्यास,उमेदवारांनी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांचेमार्फत आपले हरकत
अर्ज दि.25 जुलै पर्यंत नोंदवावी. मुदतीनंतर आलेले आक्षेप विचारात घेतले जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी
किरण पाणबुडे यांनी कळविले आहे.
00000
Comments
Post a Comment