सैन्य दलात अधिकारीपदाची संधी:मोफत पुर्वतयारी प्रशिक्षणाची सोय उपलब्ध

अलिबाग,दि. 5,(जिमाका):- भारतीय सैन्यदल,नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र  उमेदवारांना सर्विस सिलेक्श्‍न बोर्ड (एस.एस.बी.)  या परिक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे  मोफत पूर्व प्रशिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे दि. 25 जुलै  ते 3ऑगस्ट  या कालावधीत हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या कोर्ससाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन व प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.  केंद्रामध्ये एस.एस.बी.कोर्स प्रवेश मिळण्यासाठी कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस एक्झामिनेशन (UPSC) अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झामिनेशन (UPSC)पास झालेली असावी. तसेच मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी (सी)सर्टीफिकेट  अे/बी ग्रेड, एनसीसी गृप हेडक्वार्टरने एसएसबी साठी केलेली शिफारस, टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस.एस.बी. मुलाखतीसाठी कॉल लेटर व युनिव्हर्सिटी एन्ट्री स्किमसाठी एस.एस.बी. कॉल लेटर किंवा एस.एस.बी. साठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे.
रायगड जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी  सैनिक कल्याण विभाग,पुणे यांची वेबसाईट www.mahasainik.com  वरील Recruitment Tab ला क्लिक करुन त्यामधील उपलब्ध  Check List आणि महत्वाच्या तारखा (Important Dates)त्यांचे अवलोकन करुन त्याची दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून तसेच दिलेले सर्व परिशिष्ट डाऊन लोड करुन त्यांचीही दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून ते पुर्ण भरुन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड अलिबाग येथे दि. 17 जुलै 2017 रोजी मुलाखतीस हजर रहावे.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी , छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र,नाशिक रोड, नाशिक यांचा दुरध्वनी  क्र.0253-2451031 व 2451032 असून कार्यालयीन वेळेत सकाळी दहा ते साडेपाच दरम्यान प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी वर संपर्क करावा. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल.पी.जाधव (निवृत्त्) यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड