ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा:प्राविण्यता प्राप्त खेळाडुंना ऑनलाईन माहिती भरण्याचे आवाहन

अलिबाग,दि.5,(जिमाका)- आगामी काळात सन 2020,2024,2028 व 2032 वर्षात होणाऱ्या ऑलिपिंक स्पर्धेत राज्यातील खेळाडूंना सहभागी होऊन प्राविण्य मिळविता यावे यासाठी क्रीडा विभागामार्फत राज्याचे 'ऑलिंपिक व्हिजन कृती आराखडा' तयार करण्यात आला आहे.
या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, यांचेवतीने राज्यातील जिल्हा निहाय प्राविण्य प्राप्त सर्व गटातील खेळाडूंची वैयक्तिक व खेळाबाबत माहिती एकत्रित  करण्यात येत आहे. ही माहिती भरण्यासाठी गुगल फॉर्म तयार करण्यात आला आहे. हा गुगल फॉर्म (विहीत अर्ज नमुना)  विभागाच्या http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर  http://goo.gl/C\GNcsBN या लिंकवर उपलब्ध करण्यात आला आहे.
            सर्व गटातील प्राविण्यप्राप्त  खेळाडू, पालक,शाळा,महाविद्यालय,संस्था,मंडळे त्यांचे प्रशिक्षक यांनी शिक्षण विभागाच्या संकेतस्थळावर  जाऊन ही माहिती भरुन त्याची एक प्रत व आपला फोटो  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग यांचेकडे सादर करण्यात यावी, असे आवाहन आयुक्त्,क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचेवतीने करण्यात आले आहे .
सन 2016-17  मधील सर्व गटाच्या खेळनिहाय, शालेय राष्ट्रीय स्पर्धा,असोसिएशन राष्ट्रीय स्पर्धा,अखिल भारतीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धा यातील प्रथम,द्वितीय,तृतीय तसेच सहभाग असलेले खेळाडू यांची माहिती तसेच दिव्यांग खेळाडूंनी (पॅरा गेम्स-राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय)  आपली कामगिरी फॉर्म मध्ये देण्यात आलेल्या खेळ प्रकारानुसार माहिती भरावी.
खेळ प्रकार पुढीलप्रमाणे- ॲथलेटिक्स,ॲक्वेटिक, सायकलिंग, ट्रायथलॉन, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हँडबॉल,धनुर्विद्या,जिम्नॅस्टीक, बॉक्सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शुटींग, ज्युदो,कबड्डी,खो-खो, तायक्वांदो,टेनिस, क्रिकेट, सॉफ्टबॉल,बुद्धिबळ, योगा, तलवारबाजी.

रायगड जिल्ह्यातील खेळाडूंनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक