महाड येथील मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीसाठी प्रयत्नशील - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले

महाराष्ट्र शासन
जिल्हा माहिती कार्यालय, रायगड-अलिबाग
फोन नं.222019 ई-मेल :- dioraigad@gmail.com dioabg@rediffmail.com
फेसबुक :- dioraigad  ट्विटर :- dioraigad ब्लॉग :- dioraigad
 वृत्त क्र.303                                                                                                       दिनांक:- 08 जून 2017









महाड येथील मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे उद्घाटन संपन्न
मुलींच्या शासकीय वसतीगृह इमारतीसाठी प्रयत्नशील
                                                                    - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले
अलिबाग दि.8 (जिमाका), महाड येथे मुलींसाठी स्वतंत्र वसतीगृह बांधण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही  सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आज महाड येथे दिली.  सामाजिक न्याय विभागाकडून महाड येथे बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, रायगड जिल्हा परीषदेच्या अध्यक्षा कु.आदिती तटकरे, आमदार भरतशेठ गोगावले, समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे, सहायक आयुक्त प्रसाद खैरनार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सामाजिक न्याय मंत्री म्हणाले की, मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या कौशल्य आणि व्यक्तीमत्व विकासाकरीता समाजकल्याण विभाग विशेष प्रयत्न करत असून याकरीता बार्टी या संस्थेकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. याचा लाभ या वसतीगृहातील मुलांनी घेऊन आपली क्षमता  सिद्ध करावी. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे सामाजिक समतेचा लढा दिला. अशा या क्रांती भूमीतील चवदारतळयाच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्याची यंत्रणा बसविण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे ही ते म्हणाले.
यावेळी मार्गदर्शन करताना राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी वसतीगृहातील विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी शासकीय वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षेबाबतही समाजकल्याण विभागाकडून विशेष लक्ष दिले जाते असे सांगितले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शान पावन झालेल्या भूमीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले
जिल्हा परीषद अध्यक्षा कु.आदिताई तटकरे यांनी जिल्हयातील वसतीगृहांना अनुदान प्राप्त होत नसल्याचे  निदर्शनास आणून देत महाडमध्ये मुलींकरीता स्वतंत्र वसतीगृह इमारत उभी रहावी अशी मागणी केली. तर अमृतसरच्या धर्तीवर महाड चवदारतळयाचा विकास व्हावा, महाड तालुक्यातील दलित वस्त्यांच्या विकासाकरीता निधी द्यावा, अशा मागण्या आमदार भरतशेठ गोगावले यांनी केल्या. 
असे आहे नुतन वसतीगृह
महाडमध्ये समाजकल्याण विभागाकडून 100 मुलांकरीता भव्य वसतीगृह बांधण्यात आले आहे. या इमारतीमध्ये एकूण 34 खोल्या असून स्वयंपाकगृह, डायनींग हॉल, वाचनालय, व्यायामशाळा यांचा समावेश आहे. या इमारतीकरीता जवळपास 5 कोटी 69 लक्ष रूपये खर्च करण्यात आला आहे.
जावळी येथील निवासी शाळेचे उद्घाटन
जावळी, ता.माणगांव येथील अनुसूचित जातीच्या मुलांच्या शासकीय निवासी शाळेचे उद्घाटन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते झाले. यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते उभारण्यात आलेल्या इमारतीसमोर वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी समाजकल्याण विभागाचे उपायुक्त यशवंत मोरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आभार प्रदर्शन सहायक आयुक्त समाज कल्याण, रायगड अलिबाग प्रसाद खैरनार यांनी केले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक