रायगड जिल्हयात अतिवृष्टीचा इशारा

वृत्त क्र.305                                                                                               दिनांक:- 09 जून 2017
रायगड जिल्हयात
अतिवृष्टीचा इशारा
अलिबाग दि.9,(जिमाका):-रायगड जिल्ह्यात पुढील 24 तासांमध्ये काही ठिकाणी अतिवृष्टी (7 सेमी ते 12 सेमी) तर काही ठिकाणी त्यापेक्षा अधिक (12 सेमी ते 24 सेमी) पाऊस पडण्याची पूर्वसूचना दिली आहे. तसेच समुद्र खवळलेल्या स्थितीत राहणार आहे.
            अतिवृष्टीमुळे जिवीत व वित्तहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व संबंधित विभागाकडून आवश्यक त्या प्रमाणात उपाय योजना करण्यात येत आहेत. तसेच अतिवृष्टीमुळे पुर परिस्थितीत सामोरे जाण्यासाठी संबंधित विभागाकडील बचाव पथक, बचाव साहित्य्, रुग्णवाहिका आदि सुविधा तयार ठेवण्यात आल्या आहेत. नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहेत. सखल भागातून पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक प्रवाहाच्या मार्गामधील अडथळे दुर करणे, आपत्कालीन प्रसंगी पर्यायी ठिकाणी स्थलांतरासाठी आवश्यक ती कार्यवाही करणे महत्वाचे आहे. नागरीकांनी देखील आपतकालीन परिस्थितीत सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांक 02141-222118,222097,222322 असे आहेत.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक