क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे

क्षयरोग निर्मुलनासाठी नव-नवीन तंत्रज्ञानाचा
प्रभावी वापर करावा
                                           --अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे

अलिबाग(जिमाका)दि.24:-  औषधोपचारातील प्रगत तंत्रज्ञानाचा तसेच जनजागृतीसाठी प्रसार व प्रसिद्धीच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन क्षयरोग निर्मुलनाचे काम करणे आवश्य्क आहे.असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.अविनाश गोटे यांनी आज येथे केले.
सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जागतिक क्षयरोग दिनानिमित्त कुरुळ ता.अलिबाग येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.कार्यक्रमास जिल्हा शल्यचिकित्स्क डॉ.अजित गवळी,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर,परिवहन मंडळाचे व्यवस्थापक श्री.गिते,श्रीमती अनिता गोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.गोटे पुढे म्हणाले की, केंद्र शासनाने विशेष कार्यक्रमांतर्गत 2025 पर्यंत क्षयरोग निर्मुलनाचे उदिष्ट ठेवले आहे.  यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने क्षयरोगाचे छुपे रुग्ण शोधून त्यांना उपचाराच्या कार्यक्रमांतर्गत आणणे महत्वाचे आहे.एकही रुग्ण् दुर्लक्षित राहता कामा नये. याची काळजी घेणे आवश्यक् आहे. प्रगत औषधोपचाराबरोबरच क्षयरोगाविषयी जनसमान्यांमध्ये जागृती होऊन रोग निर्मुलनासाठी त्याचा उपयोग व्हावा, याकरीता  प्रसारमाध्यमांच्या नव-नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा,तसेच या कार्यक्रमात प्रत्येकाने सहभाग घ्यावा, असे आवाहनही केले.
डॉ.अजित गवळी यावेळी म्हणाले की, क्षयरोग निर्मुलनाच्या कामात राज्यात रायगड जिल्ह्याचा क्रमांक दुसरा लागतो. जिल्ह्यात संशयीत क्षयरुग्णांना तातडीने उपचार मिळावे, यासाठी फक्त खोकला येतो त्यासाठी आलेल्या रुग्णांच्या तपासणीसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. आज गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आलेल्या जिल्ह्यातील अधिकारी,कर्मचारी यांनी यापुढेही क्षयरुग्ण शोधमोहिमेत व क्षयरोग रुग्णांच्या उपचारासाठी चांगले काम करावे.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.सुरेश देवकर यांनी कार्यक्रम करण्यामागची पार्श्वभूमी सांगितली. वर्षभरात 18 लाख लोकांना क्षयरोग होतो. तीन ते चार लाख मृत्यू होतात. देशात एक हजार रुग्ण् एका दिवसात मरण पावतात. एक थुंकीदुषित रुग्ण वर्षात दहा ते पंधरा नवे रुग्ण तयार करतो. क्षयरोग प्रामुख्याने कमावत्या वयोगटातील व्यक्तींना होत असल्यामुळे कुटुंबाची व देशाची हानी होते. अशी माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
क्षयरोग निर्मुलनासाठी उत्कृष्ठ् काम केलेल्या क्षयरोग पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरवपत्र देवून सन्मान करण्यात आला.तसेच क्षयरोगासंदर्भात जनजागृतीसाठी आयोजित केलेल्या निबंध स्पर्धा,रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांना गौरवपत्र देवून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमास डॉ.सचिन देसाई,डॉ.सचिन माने, एम.जी.एम. रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी अलका पटनाईक, क्षयरोग निर्मुलनासाठी कार्यरत असलेल्या आरोग्य पथकातील  अधिकारी,कर्मचारी तसेच आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक