कंत्राटी काम मिळण्याकरिता पेण तालुक्यातील सोसायट्यांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

रायगड(जिमाका)दि.8 :- बेरोजगारांच्या सहकारी सेवा सोसायट्यांना आर्थिकदृष्टया सक्षम करण्याच्या उद्देशाने  रु.3 लाख पर्यंत इतक्या रकमेची कामे विनानिविदा उपलब्ध करुन देण्यासाठी रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या दि.11 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयान्वये जिल्हा स्तरावर काम वाटप समितीची स्थापना करण्यात आली आहे.

 त्यानुषंगाने ज्या सेवा सोसायट्यांचे कार्यक्षेत्र पेण तालुक्याकरिता आहे, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास कंत्राटी काम मिळण्याबातचे आपले प्रस्ताव दि.21 ऑगस्ट 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग या कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत.

यासाठी आवश्यक अटी व शर्तींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. उशिरा प्राप्त झालेले तसेच अपूर्ण स्वरूपातील प्रस्ताव अपात्र ठरवून स्विकारण्यात येणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त, श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी या कार्यालयास प्रत्यक्ष संपर्क साधावा अथवा कार्यालयाचे दुरध्वनी क्रमांक 02141-222029 वर संपर्क साधावा.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक