जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि कलाशिक्षण महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी “अभिव्यक्ती मताची” स्पर्धेचे आयोजन


 

अलिबाग (जिमाका),दि.11 :- विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलतेचा मतदार जागृतीसाठी उपयोग करुन घेण्याच्या दृष्टीने मुख्य् निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे अभिव्यक्ती मताची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. “अभिव्यक्ती मताची” या विषयांतर्गत जाहिरात निर्मिती, भित्तीपत्रक (पोस्टर) आणि घोषवाक्य या तीन स्पर्धा आयोजित केल्या आहेत.

या स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्र विद्या (मास मिडिया व जर्नालिझम) महाविद्यालये आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालये येथील विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. स्पर्धेचा कालावधी 01 ऑगस्ट् ते 15 सप्टेंबर 2023 हा आहे. तीन ही स्पर्धांचे विषय आणि नियम मुख्य् निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

सदर स्पर्धांचे विषय पुढीलप्रमाणे आहेत:- युवा वर्ग आणि मताधिकारी, मताधिकारी लोकशाहीचा  स्तंभ,एका मताचे सामर्थ्य, सक्षम लोकशाहीतील मतदाराची भूमिका/जबाबदारी , लोकशाहीतील सर्व समावेशकता आणि मताधिकार, तीनही स्पर्धांचे माध्यम मराठी, हिंदी आणि इंग्रजी आहे.

सदर स्पर्धांसाठी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. या बक्षिसांचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. जाहिरातनिर्मिती स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 1 लाख रुपये, दुसरे 75 हजार रुपये, तिसरे पारितोषिक 50 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 10 हजार रुपयांची आहेत.

भित्तिपत्रक (पोस्टर) स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 50 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 25 हजार रुपये, तिसरे 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत. घोषवाक्य् स्पर्धेसाठी पहिले पारितोषिक 25 हजार रुपये, दुसरे पारितोषिक 15 हजार रुपये, तिसरे 10 हजार रुपये आणि दोन उत्तेजनार्थ पारितोषिक प्रत्येकी 5 हजार रुपयांची आहेत.

मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी महाराष्ट्रातील जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या आणि कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन केले आहे. तसेच रायगड जिल्हयाचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी रायगड जिल्हयातील जनसंज्ञापन व वृत्त विद्या आणि सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालयांच्या अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये भाग घ्यावा असे आवाहन केले आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक