महिलांसाठी विशेष पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


 

रायगड(जिमाका)दि.11:- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड-अलिबाग व ग्रामीण प्रगती फाउंडेशन, माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.19 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 ते 02.00 वाजेपर्यंत गांधी मेमोरियल हॉल, निजामपूर रोड, मुंबई-गोवा हायवे जवळ, ता.माणगाव या ठिकाणी जिल्ह्यातील बेरोजगार महिलांसाठी ‍विशेष पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी दिली आहे.

             जिल्ह्यातील नामांकीत आस्थापनांकडील रिक्तपदांच्या भरतीसाठी रोजगार मेळावा आयोजित केला आहे.  सदर रोजगार मेळाव्यात एस.एस.सी./एच.एस.सी, आय.टी.आय., डिप्लोमा इंजिनियर, पदवी इंजिनियर, व इतर पदवी धारक नोकरी इच्छूक उमेदवारांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. सदरच्या पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्यास स्वयंरोजगार करु इच्छिणाऱ्या बेरोजगार महिलांसाठी जिल्हयातील विविध महामंडळे यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजना विषयीची माहिती व मार्गदर्शन उमेदवारांना दिले जाणार आहे. या विभागाच्या  संकेतस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पध्दीतीने अर्ज करता येईल. प्रथम https://rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावरील  Employment - Job Seeker (Find A Job) - Job Seeker Login या क्रमाने जाऊन आपल्याकडील युजर आयडी व पासवर्ड वापरुन आपली शैक्षणिक माहीती अद्ययावत करून त्यातील Pandit Dindayal Upadhyay Job Fair या ऑप्शन मधून आपला जिल्हा निवडून जिल्ह्याच्या नावावरील Vacancy Listing-I Agree व दिसणाऱ्या  विविध पदाना  आपल्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे ऑनलाईन अप्लाय करावे.

              रोजगार मेळाव्यातील रिक्तपदांची माहिती https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. संकेतस्थळावर ऑनलाईन अप्लाय करताना काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा श्री.महेश भा.वखरे, लिपिक-टंकलेखक यांच्या मो.9421613757 वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त श्रीम.अ.मु.पवार यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक