माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत पंचप्राण शपथ कार्यक्रमात सर्वांनी सहभागी व्हावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बास्टेवाड यांचे आवाहन

 


 

रायगड दि.8 (जिमाका):- माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ दि.09 ऑगस्ट 2023 रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून होत आहे. या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व कार्यालयांत ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रम सकाळी 10 वाजता होणार आहे. या कार्यक्रमात जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

रायगड जिल्ह्यात दि.09 ते दि.20 ऑगस्ट दरम्यान, ‘माझी माती, माझा देश’ मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था  स्तरावर कार्यक्रम होणार आहेत. यात देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून स्थानिक लोकप्रतिनिधीं व लोकसहभागातून हे अभियान आयोजित करण्यात येत आहेत. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील 15 तालुकयतील 809 ग्रामपंचायत मध्ये शिलाफलक लावण्याचे काम सुरु आहे. तसेच 75 देशी वृक्षाची रोपे वन विभाग आणि सामाजिक वनिकरण विभागाकडून उपलब्ध करून घेण्यात येत आहेत.

  उद्या होणाऱ्या ‘पंचप्राण शपथ’ कार्यक्रमात घ्यायच्या  शपथचा नमुना पुढीलप्रमाणे आहे.

भारतास 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू.

गुलामीची मानसिकतामूळापासून नष्ट करु.

देशाच्या समृध्द वारशाचा गौरव करु.

भारताची एकात्मता बलशाली करु आणि देशाचे संरक्षण

करणान्यांप्रती सन्मान बाळगू.

देशाचे नागरीक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु.

जिल्ह्यातील प्रत्येक कार्यालयात या शपथेचे वाचन प्रत्येक करण्यात येणार आहे.

 नागरीकांनी देखील ‘माझी माती, माझा देश’ या कार्यक्रमात सहभागी होऊन माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेली सेल्फी https://merimaatimeradesh.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करावी तसेच देशाच्या विरांसाठी समर्पित या कार्यक्रमात  सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भरत बास्टेवाड यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक