माझी माती माझा देश' उपक्रम रायगड जिल्ह्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी घेतली पंचप्रण शपथ

 

 

रायगड,दि.9(जिमाका):- ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमाचा प्रारंभ आज क्रांती दिनाचे औचित्य साधून करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व कार्यालयात  ‘पंचप्रण शपथ’ घेण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे, पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांच्या उपस्थितीत शपथ घेण्यात आली.

जिल्ह्यातील विविध कार्यालयामध्ये आज पंचप्रण शपथ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत पंचायत समिती, तहसीलदार कार्यालये, महानगर पालिका, नगरपालिका, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा कोषागार कार्यालय, जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा माहिती कार्यालय आदी कार्यालयांमध्ये पंचप्रण शपथ घेण्यात आली.

उरण येथे ‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत स्वातंत्र्य सैनिकाचा सन्मान

‘माझी माती, माझा देश’ उपक्रमांतर्गत आज दि 9 ऑगस्ट या क्रांती दिनाचे औचित्य साधून  स्वातंत्र्य सैनिक रामनाथ सखाराम गायकवाड यांची पनवेल उपविभागीय अधिकरी राहूल मुंडके यांनी  भेट घेऊन शाल, श्रीफळ, भेट, रक्त उच्च दाब तपासणी यंत्र, पुष्पगुछ देऊन सन्मान केला. त्यांची व त्यांच्या कुटुबियांची आरोग्य, कौटुंबिक, अडचणी चौकशी करुन यावेळी त्यांना मासिक निवृत्ती योजनेचा धनादेश देण्यात आला.

उरण तालुक्यातील उरण कोट येथील स्वातंत्र्य सैनिक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित यावेळी उरण तहसीलदार डॉ.उद्धव कदम तसेच निवासी नायब तहसिलदार, विविध शाखांचे नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पंचायत समिती कार्यालय अलिबाग येथे मातीचे दिवे

प्रत्वलित करत घेतली पंचप्राण शपथ

अलिबाग पंचायत समिती प्रागंणात कार्यक्रमाचे आयोजन करुन झाली. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे यांच्या प्रमुख उपस्थितीत याप्रसंगी सुरुवातीस सर्व उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना मातीचे दिवे देण्यात आले. सदर मातीचे दिवे प्रज्ज्वलीत करुन शपथ घेण्यात आली. यावेळी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे, गट विकास अधिकारी शुभांगी नाखले, कार्यकारी अभियंता (बांधकाम) प्रसन्नजित राऊत, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, बाल विकास व संरक्षण अधिकारी गितांजली पाटील व शिक्षण विभाग, जि.प. बांधकाम विभाग, पंचायत समिती आदींमधील अधिक्षक, कक्ष अधिकारी, लेखाधिकारी, विस्तार अधिकारी मधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.   

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक