प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका स्थापनेबाबत अलिबाग व मुरुड येथे कार्यक्रम संपन्न


 

अलिबाग (जिमाका), दि. 11 :- महाराष्ट्रातील 720 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारपट्टी लाभलेली आहे. त्यापैकी रायगड जिल्ह्याला 122 किलोमीटर लांबीची सागरी किनारपट्टी लाभलेली आहे. राज्यातील मासेमारी, मत्स्य व्यवस्थापन व मत्स्य प्रजातींचे संरक्षण ही काळाची गरज असून त्या दृष्टीने कृत्रिक भित्तीकांची पाखरण करणे हा एक प्रभावी उपाय वाटतो.

प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेंतर्गत कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) स्थापनेबाबत 6 ऑगस्ट  2023 रोजी अलिबाग  व मुरुड तालुका येथे  व 7 ऑगस्ट 2023 रोजी श्रीवर्धन येथे कृत्रिम भित्तीका उभारण्यासाठी मच्छिमारांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाला वरील तालुक्यातील नौका मालक, तांडेल, खलाशी व संस्था पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

तसेच मच्छिमारांना कृत्रिम भित्तिकांची उभारणी करण्यासाठी समुद्रातील योग्य जागा निवड करण्यासाठी या कार्यक्रमांमुळे सुकर जाईल, असे जाणवले. कारण त्यांनी  कार्यक्रमात अनेक प्रश्न  विचारुन कृत्रिम भित्तिका (Artificial Reef) या शास्त्रीय संकल्पनेची माहिती जाणून, समजून घेण्याचा प्रयत्न केला. सदर कार्यक्रमाला जिल्ह्यातील 250-265 मच्छिमारांनी प्रतिसाद दिला. या कार्यक्रमांना डॉ.श्री.जो. किझाकुडन, प्रधानशास्त्रज्ञ (CMFRI) प्रादेशिक केंद्र, विशाखापट्टणम व त्यांच्या चमु अनमोल मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त व मुंबई विभाग सहआयुक्त श्री. देवरे यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमासाठी परवाना अधिकारी, श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, कार्यालयीन अधिकारी, सागरमित्र व सुरक्षा रक्षक कार्यरत होते .याबाबत संपर्कासाठी अधिकारी श्री.सं. वा. पाटील, सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां) रायगड अलिबाग. कार्यालयाचा पत्ता-तिसरा मजला, श्री. सिद्धी अपार्टमेंट, डॉ.पुष्पलता शिंदे हॉस्पिटलच्या समोर,अलिबाग-पेण रोड, पिनकोड 402201,दुरध्वनी क्र.02141-295221 आहे.

या कार्यक्रमांमध्ये रायगड अलिबाग मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त संजय वामन पाटील यांनी मच्छिमारांनी कृत्रिम भित्तिका उभारण्यासाठी व त्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी गावनिहाय समिती तयार करण्यासाठी उपस्थित मच्छिमारांना आवाहन केले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक