आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना मोफत प्रशिक्षण - जिल्हाधिकारी निधी चौधरी राबविला जाणार "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम"

 


 

            अलिबाग,जि.रायगड, दि.21 (जिमाका):-  आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असलेल्या राज्यातील 18 ते 45 वयोगटातील युवक/ युवतींना  हेल्थ केअर, मेडिकल व नर्सिंग क्षेत्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण प्रदान करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्यामध्ये प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता  विकास अभियान अंतर्गत "मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम" राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

हा  प्रशिक्षण कार्यक्रम On Job Training या तत्वावर राबविण्यात येणार आहे. यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांनी निवड केलेल्या अभ्यासक्रमानुसार त्यांना MSCVT/SSC यांच्यामार्फत प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. 

या योजनेचा जिल्हयातील जास्तीत जास्त लाभ इच्छुक उमेदवारांनी  https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdtZpvLGa31Rp7YevA7_iSIgYX0zgv3E98us8jYcSx9YawF8A/viewform?usp=sf_link  या गुगल फॉर्म लिंकवर आपली माहिती भरुन घ्यावा, तसेच ही माहिती जास्तीत जास्त गरजू उमेदवारांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निधी  चौधरी व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त श्री. शा.गि. पवार यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक