सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रायगड डाक विभागामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न

 


 

            अलिबाग,जि.रायगड,दि.21(जिमाका):- सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून भारतीय डाक विभागामार्फत योगसंबधीत विशेष कॅन्सलेशनचे अनावरण केले गेले. त्या निमिताने देशभरातील 810 मुख्य टपाल कार्यालयांमध्ये दि.21 जून रोजी नोंदणी झालेल्या सर्व टपाल तिकिटांवर योगसंबधीत विशेष कॅन्सलेशन "बी विथ योगा बी अ होम" हा संदेश हिंदी व इंग्रजी भाषेतून शाईने उमटविण्यात आला आहे.

टपाल तिकिटांचा संग्रह करण्याची आवड असलेल्या आणि त्याचा अभ्यास करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने अशा विशेष कॅन्सलेशनला अधिक महत्व दिले जाते. हा उपक्रम रायगड डाक विभागातील अलिबाग मुख्य डाक कार्यालयात साजरा करण्यात आला.

आजच्या योगदिनाचे निमित्त साधीत रायगड डाक अधीक्षक श्री. ए.जी.पाखरे यांनी डाक कार्यालयातील कर्मचारी वर्गास कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर आपली आपत्कालीन यंत्रणेतील गरज समजून साध्यासोप्या योग पद्धतीने आपले आरोग्य सुस्थितीत ठेवावे तसेच आपल्या आजूबाजूचे  व आपल्या कार्यालयातील वातावरण सुदृढ ठेवावे,  असा संदेश दिला.

याबरोबरच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर "योग करा घरी राहा" या विषयावर कर्मचाऱ्यांसाठी योगविषयक ऑनलाईन वेबिनारचेही आयोजन करण्यात आले होते. यास सर्व कर्मचारीवर्गाचा उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळाला.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड