गणेशोत्सवाकरिता रायगड जिल्ह्यात प्रवेश करतेवळी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस पूर्ण केलेल्या व्यक्तींना आरटीपीसीआर बंधनकारक नाही शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गणेशोत्सव साजरा करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका) :- गणेशोत्सव सणाकरिता रायगड जिल्ह्यात प्रवेश करतेवळी ज्या नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीचे दोन मात्रा (डोस) पूर्ण केलेल्या आहेत,अशा नागरिकांना जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता आरटीपीसीआर चाचणीची आवश्यकता नाही. मात्र ज्या नागरिकांनी कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीच्या दोन मात्रा पूर्ण केलेल्या नाहीत,त्यांनी जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास पूर्वीपर्यंतच्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सोबत बाळगावा, परंतु 18 वर्षाखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने, त्यांच्या प्रवेशास आरटीपीसीआर चाचणी अहवाल आवश्यक राहणार नाही.

तसेच शासनाच्या https:/epassmsdma.mahait.org/LoginHandler.htm या संकेतस्थळावरुन दोन मात्रा पूर्ण झालेल्या नागरिकांनी प्राप्त होणारा Universal Pass उपलब्ध करुन घ्यावा, जेणेकरुन प्रवासदरम्यान तपासणीकरीता लागणाऱ्या वेळेची बचत होईल.

गणेशोत्सव-2021 करिता महाराष्ट्र शासन, गृह विभागाकडील क्रमांक आरएलपी 0621/ प्र.क्र. 144 / विशा 1 ब, दि. 29 जून 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचे पालन करुन गणेशोत्सव-2021 चा सण साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक