रोहा तालुक्यातील विविध महिला ग्रामसंघाच्या माध्यमातून शोभिवंत वस्तूंच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन

 


अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):-  रायगड जिल्ह्यातील तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, रोहा येथील ग्राम पंचायत- वरसगाव येथे स्त्री शक्ती महिला ग्रामसंघ यांच्या माध्यमातून वरसगाव येथे महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूचे विक्री प्रदर्शन दि.05 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले महिला ग्रामसंघ, पुगाव येथेही एकदिवसीय विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले होते.

या विक्री प्रदर्शनात महिला स्वयंसहाय्यता समूहाच्या महिलांनी ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांनी शोभिवंत तोरणे, फ्लॉवर पॉट, अगरबत्ती, धूपकांडी तसेच गणपती उत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंची विक्री केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथे खाद्य पदार्थांचे स्टॉलसुद्धा लावण्यात आले होते.

विशेष म्हणजे वरसगाव येथे महिलांनी स्त्री शक्ती ग्रामसंघाच्या माध्यमातून आळीपाळीने बचतगटाच्या माध्यमातून कामाचे नियोजन करून सलग दहा दिवस या विक्री प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.  याचे सर्व नियोजन महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांनी केले होते. त्याचप्रमाणे इतर ग्रामसंघही अशा प्रकारच्या विक्री प्रदर्शनाचे आयोजन येत्या काळामध्ये करणार आहेत.

जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष रायगड-अलिबाग येथून जिल्हा व्यवस्थापक (मार्केटिंग) श्री. सिद्धेश राऊळ, , जिल्हा व्यवस्थापक (क्षमता बांधणी) श्री. चंद्रशेखर पाटील यांनी गणेश उत्सवानिमित्त लावलेल्या या विविध स्टॉलला भेट दिली, स्टॉलवर खरेदी देखील केली व तेथील महिलांना मार्गदर्शन करून या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थित पंचायत समिती सदस्या सौ.सिद्धी राजिवले, ग्रामपंचायत सरपंच विशाखा राजिवले, ग्रामपंचायत सदस्या प्रभाग समन्वयक दुष्यंत मोकल, ग्रामसंघातील पदाधिकारी, विविध महिला बचतगटातील महिला, समुदाय संसाधन व्यक्ती संजना राजिवले, जान्हवी राजिवले उपस्थित होत्या. यावेळी या प्रदर्शनास गावातील व तालुक्यातील जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक