जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे घेतले दर्शन तळीये गावाच्या पुनर्वसन कामाचा घेतला आढावा

 



अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):-  जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी काल (दि.05 सप्टेंबर) रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज तसेच पाचाड येथील राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या समाधीचे दर्शन घेतले.  त्याचप्रमाणे त्यांनी या भेटीदरम्यान रायगड विकास प्राधिकरण अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामांची माहिती घेतली.  यावेळी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, रायगड विकास प्राधिकरण कार्यकारी अभियंता श्री.विश्वनाथ सातपुते, रायगड रोप वे चे संचालक श्री.जोग हे उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी तळीये येथील पुनर्वसनाच्या जागेची तसेच तिथे दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची  पाहणी केली. यासंबंधी सर्व कामांचा आढावा घेवून संबंधित अधिकाऱ्यांना तळीये  येथील बाधित लोकांचे तात्पुरते पुनर्वसन त्वरित करण्याबाबत सूचना दिल्या.

यावेळी महाड प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, महाड तहसिलदार सुरेश काशिद, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.खाडे, तळीयेचे सरपंच संपत तांदलेकर,सभापती पंचायत समिती श्रीमती सपना मालुसरे, जिल्हा परिषद सदस्य श्री.मनोज काळीजकर, जिल्हा परिषद बांधकाम उपअभियंता श्री.देशमुख, तळीये  मंडळाधिकारी, तलाठी आणि  ग्रामस्थ उपस्थित होते.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक