अन्न पदार्थाचे उत्पादन साठवणूक/वितरण/आयात/विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकांनी अन्नपरवाना/नोंदणी घेणे बंधनकारक

 


अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):-  अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये दि.05 ऑगस्ट, 2011 पासून लागू झालेला आहे व त्याची अंमलबजावणी या प्रशासनातर्फे यशस्वीपणे करण्यात येत आहे.

      सर्व जनतेस सकस, ताजे, गुणवत्तापूर्ण व निर्भेळ अन्न पदार्थ उपलब्ध झाले पाहिजे,हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. कोणत्याही प्रकारच्या अन्न पदार्थाचे उत्पादन/साठवणूक/वितरण/आयात/ विक्री करण्यापूर्वी अन्न व्यावसायिकाने अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006, नियम व नियमन 2011 चे कलम 31 (1) व (2) सहवाचन कलम अन्न सुरक्षा व मानदे (अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी ) नियमन 2011 चे विनियम 2.1.2(1) नुसार अन्न परवाना/नोंदणी घेणे बंधनकारक आहे.

        कोणत्याही अन्न व्यावसायिकाने विनापरवाना/विनानोंदणी व्यवसाय केल्यास कायदयातील कलम 63 नुसार त्यासाठी कमाल 06 महिने कारावास व रूपये 5 लाखापर्यंत दंडाची तरतूद आहे.

        रायगड जिल्हयातील सर्व अन्न अन्न व्यावसायिकांना अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य,रायगड, पेण या कार्यालयातर्फे आवाहन करण्यात येते की, कायद्यतील तरतुदीनुसार आपण आपला अन्न व्यवसाय सुरू करण्यापूर्वी अन्न परवाना/नोंदणी घेवूनच व्यवसाय सुरू करावा. सद्य:स्थितीत ज्या अन्न व्यावसायिकांकडे अन्न परवाना/नोंदणी नसतील तर त्यांनी foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर आपापल्या क्षेत्रातील "आपले सरकार सेवा" केंद्राकडून ऑनलाईन अर्ज करावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, रायगड- पेण या कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची आवश्यकता नाही.

       परवाना/ नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या संदर्भात कोणतीही अडचण आल्यास कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02143-252085 वर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे सर्व उत्पादक/आयातदार/वितरक यांनी अन्न पदार्थ खेरेदी/विकी करताना फक्त परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थ खरेदी विक्री करावी. तसेच सर्व हॉटेल/रेस्टॉरंट व्यावसायिकांनी परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकांकडूनच अन्न पदार्थ खरेदी/विक्री करावी व त्याचे अभिलेख जतन करावेत.    प्रत्येक अन्न व्यावसायिकाने ग्राहकास सुरक्षित, निर्भेळ अन्नपदार्थ उपलब्ध होतील याची दक्षता घ्यावी.   प्रशासनातर्फे विनापरवाना/विनानोंदणी अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यावसायिका विरोधात धडक मोहीम राबविण्यात येणार आहे.

       तरी पुढील संभाव्य कार्यवाही टाळण्यासाठी जिल्हयातील सर्व उत्पादक/साठवणूक/वितरक/आयातदार/घाऊक विक्रेत/किरकोळ विक्रेते/हाटेल-रेस्टॉरंट/कॅन्टीन/फळे-भाजीपाला विक्रेते/पानटपरीधारक/हातगाडीवाले/फेरीवाले/हॉकर्स तसेच जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारे भाजी मंडईवाले, आठवडी बाजारातील स्टॉलधारक, यात्रेतील स्टॉलधारक देवस्थान परिसरातील स्टॉलधारक इत्यादी सर्व लहान मोठे अन्न पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांनी तात्काळ अन्न परवाने/नोंदणी काढून या प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) पदावधित अधिकारी, अन्न व औषध प्रशासन रायगड-पेण लक्ष्मण दराडे यांनी केले आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक