विद्यार्थ्यांचे सन 2020-21 चे शिष्यवृतीचे नवीन अर्ज तर 2019-20 करिता नूतनीकरणासाठी अर्ज सादर करावेत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांचे महाविद्यालयांना आवाहन

   

 

          अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-  महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार शिष्यवृती  व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क या योजनेंतर्गत माहिती,अडचणीबाबत दि.04 जानेवारी 2021 रोजी येरला दंत महाविद्यालय, खारघर येथे  जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या बैठकीचे आयोजन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.

या बैठकीत सहाय्यक आयुक्त सुनिल जाधव यांनी उपस्थितांना सूचना दिल्या की, सर्व महाविद्यालयांनी सन 2020-21 करिता शिष्यवृत्तीचे नवीन अर्ज व सन 2019-20 करिता नूतनीकरणाचे अर्ज भरावेत.  त्याबाबत विद्यार्थ्यांना सहकार्य करावे व पाठपुरावा करावा.  तसेच महाविद्यालय सुरु नसल्याने विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यास त्रास होऊ नये, यासाठी महाविद्यालयांमार्फत बोनाफाईड तसेच मार्कशिट इत्यादी आवश्यक कागदपत्रे ही ई-मेल व घरपोच देण्यात याव्यात.

            महाविद्यालयांनी सन 2011-12 ते 2017-18 या कालावधीतील प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत.  सन 2011-12 ते सन-2017-18 कालावधीतील महाविद्यालयाने पुढील 7 दिवसात प्रस्ताव सादर न केल्यास  व विदयार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित राहिल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित महाविद्यालयाची राहील, असेही  सहाय्यक आयुक्त श्री.सुनिल जाधव यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक