‘महात्मा गांधी स्मृती निलय’ बैठक मंत्रालयात संपन्न

 



 

अलिबाग,जि.रायगड दि.06 (जिमाका) :-  महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीच्या औचित्याने शिवाजीनगर, पुणे येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन खादी व ग्रामोद्योग विभागामार्फत उपलब्ध जागी ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ या माहिती व वस्तू संग्रहालय स्थापन करण्यासाठी प्रस्ताव मंजूर आहे. त्यानुषंगाने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्योग राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु. आदिती तटकरे उपस्थित होत्या.

            यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या, महात्मा गांधीजींच्या जीवनप्रवास आधुनिक माध्यमातून सर्वांना पहाता येईल, त्यासाठी पुणेसारख्या महत्त्वाच्या शहरात स्थापन होणारे ‘महात्मा गांधी स्मृती निलय’ हे संग्रहालय येणाऱ्या पीढीला निश्चितच मार्गदर्शक व दिशादर्शक ठरेल.

2021 हे वर्ष महात्मा गांधी जयंतीचे 151 वे वर्ष असून या नियोजित संग्रहालयाच्या पुढील तांत्रिक बाबीं व निधी उपलब्धतेसाठी ग्रामविकास विभागामार्फत प्रस्ताव वित्त विभागास तातडीने सादर करण्याबाबतचे निर्देश ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.

            या बैठकीत नियोजित प्रकल्पाचा ॲनिमेटेड आराखडा सादरीकरणाच्या माध्यमातून सादर करण्यात आला. या बैठकीस  ग्रामविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, खादी व ग्रामोद्योगच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नीलिमा केरकेट्टा व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक