स्त्री-पुरुष समानतेचा विचार समाजाच्या सर्वच स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजायला हवा --जिल्हाधिकारी निधी चौधरी

 


 

अलिबाग,जि.रायगड,दि.08 (जिमाका):- निसर्गाने स्त्री-पुरुष निर्माण केले, समाजव्यवस्था मात्र मानवाने निर्माण केली. यामध्ये स्त्री-पुरुष समानता समाजाच्या सर्व स्तरांमध्ये प्रभावीपणे रुजवायला हवी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी निरी चौधरी यांनी आज येथे केले.

बेटी बचाव,बेटी पढाव,बेटी बढाव या उपक्रमांतर्गत गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंग निवडीस प्रतिबंध) कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजस्व सभागृहात आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या.

 यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, रेडिओलॉजिस्ट डॉ.सुहास ढेकणे, ॲड. नीला तुळपुळे, डॉ.ॲड. निहा अनिस, ॲड.नीता कोळी, ॲड. पल्लवी तुळपुळे, ॲड.वर्षा पाटील, डॉ.बसवराज लोहारे, डॉ.भास्कर जगताप, डॉ.प्रदीप इंगोले, डॉ.भाग्यरेखा पाटील, डॉ.अंकिता मते, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने, महिला व बालविकास संरक्षण अधिकारी श्रीमती एस.एम.वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक सरला काळे, पोलीस हवालदार नीलम नाईक, प्रिया चौलकर, सामाजिक कार्यकर्ते सुशील साईकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हाधिकारी निधी चौधरी पुढे म्हणाल्या, आपणास आपल्या मुलांना जात, पात, धर्म, प्रांत भाषा या पलीकडे जाऊन मानवतेच्या दृष्टीने चांगले संस्कार देणे गरजेचे आहे.  विशेषतः यासाठी स्वतःच्या कुटुंबापासूनच आपणच सुरुवात करायला हवी.  विशेषतः मुलांना आदर्श पुरुष कसे बनावे, याचे मार्गदर्शन करणे महत्त्वाचे आहे.  प्रत्येक पुरुषाने स्त्रीच्या नकाराचा सन्मान राखीत तिचा नकार समजून घ्यायला हवा.  गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंगनिवड प्रतिबंध) कायदा सर्वांनी समजून घेऊन त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी समाजाच्या सर्व स्तरातून प्रबोधन होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले.

 या कार्यशाळेच्या निमित्ताने सुरुवातीस डॉ. सुहास माने यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर डॉ.ॲड. निहा अनिस व ॲड.नीला तुळपुळे यांनी गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र (लिंगनिवड प्रतिबंध) या कायद्याची माहिती तसेच प्रभावी अंमलबजावणीकरिता काय करणे अपेक्षित आहे, याबद्दल त्यांचे विचार मांडून स्त्रियांनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे, ही काळाची गरज बनली असल्याचे मत व्यक्त केले.  

कार्यशाळेच्या शेवटी रेडिओलॉजिस्ट डॉ. सुहास ढेकणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक