माजी सैनिक/माजी सैनिक विधवांचे पाल्यांसाठी पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत अर्ज भरण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ

 


 

        अलिबाग,जि.रायगड,दि.06 (जिमाका):- सन 2020-2021 या शैक्षणिक वर्षातील पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ऑनलाईन पध्दतीने www.ksb.gov.in या संकेत स्थळावर अर्ज भरावयाची अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे.त्यानंतर अपलोड केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची सर्व माजी सैनिक/माजी सैनिक विधवांनी  नोंद घ्यावी.

      अधिक माहितीकरिता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, रायगड-अलिबाग यांचे दूरध्वनी  क्रमांक 02141-222208 वर संपर्क साधावा किंवा प्रत्यक्ष भेटावे. त्याचबरोबर केंद्रिय सैनिक बोर्डच्या www.ksb.gov.in या संकेतस्थळावरून आधिक माहिती प्राप्त करून घ्यावी.

      जिल्हयातील 60 टक्के  पेक्षा  जास्त गुण मिळविलेल्या  माजी सैनिक/माजी सैनिक विधवांच्या पाल्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, रायगड-अलिबाग मेजर सुभाष सासने (निवृत)  यांनी केले आहें.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड