जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर प्रभात फेरी संपन्न

 


अलिबाग,दि.01(जिमाका):जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृतीपर जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर,यांच्या  मार्गदर्शनानुसार  तसेच   जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांच्या नियोजनानुसार प्रभात फेरी आज येथे संपन्न झाली.

जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील,   पोलीस उपअधीक्षक श्री.जगदीश काकडे,  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ॲड.अमोल शिंदे व आर.सी.एफ.कंपनी, थळ येथील कार्यकारी संचालक अनिरुद्ध खाडिलकर यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून प्रभात फेरीची सुरुवात करण्यात आली.

या प्रभात फेरीकरिता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या  अधिष्ठाता  डॉ. पूर्वा पाटील, जिल्हा आरोग्य  अधिकारी  डॉ. सुधाकर मोरे,  अेआरटी सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ.शितल जोशी, आर.सी. एफ. कंपनी थळ येथील  जनसंपर्क अधिकारी श्री.संतोष वझे, श्री. प्रमोद देशमुख,  लायन्स क्लब श्रीबागच्या अध्यक्षा  ॲड. कला पाटील, ॲड.निहा राऊत या उपस्थित होत्या.  

ही प्रभात फेरीची   सुरुवात   जिल्हा  रुग्णालय  येथून होवून  एस.टी.स्टॅन्ड  ते  शिवाजी चौक,  बालाजी नाका  ते जिल्हा सामान्य  रुग्णालय  या  ठिकाणी  सांगता करण्यात आली.   या  प्रभात  फेरीत  शहरातील  विविध  महाविद्यालयातील  विद्यार्थी   फलक  हातात घेऊन  घोषवाक्यासह  सहभागी  झाले  होते. 

रॅली जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या प्रांगणात पोहोचल्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांना लायन्स क्लब श्रीबाग यांच्याकडून बिस्किटांचे तर  दि रूरल अँड यंग  फाऊंडेशन  संस्था, पेण यांच्याकडून पाणी  वाटप करण्यात आले.

          यावेळी सकाळी 9.30 वा. प्रभात फेरीकरिता जे.एस.एम. कॉलेज, पी.एन.पी. कॉलेज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, होमिओपॅथी मेडिकल कॉलेज तसेच नर्सिंग स्कूलचे विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते. यावेळी  दि.01 डिसेंबर जागतिक दिनाचे महत्व सांगून दि.01 डिसेंबर ते दि.31 डिसेंबर या कलावधीत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमांबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली. तसेच आपली एकता,आपली समानता, एचआयव्ही सह जगणाऱ्यांकरिता या संकल्पनेवर आधारित जनजागृती करण्यात आली.  जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव ॲड. अमोल शिंदे यांनी उपस्थितांना  एचआयव्ही  एड्सबाबतची  शपथ  दिली.

             प्रभात फेरीची सांगता झाल्यानंतर  जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांना  एचआयव्ही/एड्सविषयी मूलभूत  माहिती, कलंक आणि भेदभाव, एचआयव्हीचा प्रतिबंध, एचआयव्ही संसर्गितांसाठी सेवा-सुविधा, एचआयव्ही   सकारात्मक  जीवनशैली,  एचआयव्हीमुळे  देशाच्या  विकासावर होणारा  परिणाम,  एचआयव्ही  संदर्भात  तरुणांची  भूमिका    जबाबदारी,  एचआयव्ही  कसा होता, काय केल्याने होत नाही, एचआयव्ही होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यावी याबाबतची सविस्तर माहिती  सांगितली.

एआरटी वैद्यकीय अधिकारी डॉ.नालंदा पवनारकर यांनी एचआयव्ही म्हणजे काय, एचआयव्ही संसर्गित व्यक्तीबद्दल कसे वागावे, त्यांना समजून घेऊन, स्वतःची काळजी कशी घेता येईल याबद्दल तसेच एचआयव्ही संसर्गितांना देण्यात येणाऱ्या औषधोपचाराबाबत व पोस्ट एक्सपोजर प्रोफिलॅक्सिस याबाबतची माहिती दिली. 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.पूर्वा पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना डॉक्टर होत असताना किंवा आरोग्य क्षेत्रात काम करताना सामाजिक बांधिलकी जपून प्रत्येक रुग्णाबरोबर आपुलकीने वागण्याबाबत प्रबोधन केले. 

            1 डिसेंबर  जागतिक  एड्स  दिनाचे  औचित्य  साधून  जिल्हा  एड्स  प्रतिबंध   नियंत्रण  विभाग  रायगड  अंतर्गत  रायगड  जिल्ह्यातील  कार्यरत असणाऱ्या  नाविन्यपूर्ण सामाजिक बांधिलकी जपून प्रोत्साहनपर काम केल्याबद्दल डॉ. नालंदा पवनारकर, एआरटी  वैद्यकीय  अधिकारी यांना   उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) श्री. सर्जेराव मस्के-पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच  मागील सन  2021-22 मध्ये  उत्कृष्ट  काम  करणाऱ्या  कर्मचाऱ्यांना  आयसीटीसी 01, जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथील समुपदेशक अर्चना धव, आर.सी.एफ.कंपनी थळ येथील कार्यकारी संचालक श्री. अनिरुद्ध खाडिलकर व प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सौ.सुजाता तुळपुळे  यांना पोलीस उपअधीक्षक श्री. जगदीश काकडे   यांच्या शुभहस्ते  प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले . 

या कार्यक्रमास अेआरटी सेंटरच्या नोडल अधिकारी डॉ.शितल जोशी, जिल्हा सहाय्यक लेखा रवींद्र कदम, जिल्हा सहाय्यक एम.ॲड.ई सौ.रश्मी सुंकले, जिल्हा सहाय्यक  कार्यक्रम श्रीम.संपदा मळेकर, डापकू, आयसीटीसी प्रयोगशाळा तंत्रज्ञ  सौ.सुजाता तुळपुळे, अमित सोनवणे, समुपदेशक अर्चना जाधव, सचिन जाधव, कल्पना गाडे, मोबाईल आयसीटीसी व्हॅन समुपदेशक रामेश्वर मुळे, प्रयोगशाळा तंत्रज्ञ गणेश सुतार, वाहनचालक अतिश नाईक, क्लिनर श्री.रुपेश पाटील, रक्तपेढी प्रयोगशाळा तंत्रज्ञ हेमकांत सोनार,वाहनचालक महेश घाडगे, एआरटी कर्मचारी समुपदेशक दीप्ती चव्हाण, डेटा मॅनेजर कोमल लोखंडे, औषध निर्माता सायली म्हात्रे, स्टाफ नर्स पल्लवी पडवळ, सीसीसी प्रेमा खंडागळे  जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिसेविका, सहाय्यक अधिसेविका, नर्सिंग ऑफिसर, परिसेविका, सार्वजनिक आरोग्य परिचारिका, अधिपरिचारिका, दि रूरल अँड यंग  फाऊंडेशन  संस्था प्रतिनिधी  श्री. सुशील साईकर, रायगड जिल्हा विधी प्राधिकरण सेवा, जिल्हा न्यायालय अलिबाग मधील सौ. मगर  हे उपस्थित होते.  

       या कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सिकलसेल समन्वयक  प्रतिम सुतार  यांनी केले तर व आभार प्रदर्शन जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग  संजय माने  यांनी केले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक