महाड येथील को.ए.सो.वि.ह.परांजपे विद्यामंदिरामध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे मॉकड्रिल यशस्वीरित्या संपन्न

 



 

अलिबाग,दि.02 (जिमाका): नागरी संरक्षण दल व होमगार्ड यांच्यामार्फत राज्य स्कूल सेफ्टी कार्यक्रमांतर्गत राज्यातील 34 जिल्ह्यांमधील शाळांमध्ये आपत्तीचे मॉकड्रिल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र राज्यशिक्षण विभाग व युएनडीपी तसेच महाराष्ट्र आपत्ती विभाग यांच्या पुढाकाराने रिका इंडिया या संस्थेच्या सहाय्याने राज्यभरात असे मॉकड्रिल होणार आहेत. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील महाड मधील को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड या शाळेची निवड करण्यात आली होती. त्यानुसार को.ए.सो. वि.ह.परांजपे विद्यामंदिर, महाड  येथे बुधवार दि. 30 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 11.40 वा. मॉकड्रिल कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

सकाळी नागरी संरक्षण दलाचे अधिकारी व त्यांच्या सहकार्याने शाळेत सकाळी 8.00 ते 11.00 यावेळेत शाळेतील इ.9 वी च्या वर्गातील 87 विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सरावाचे प्रशिक्षण दिले. यामध्ये विद्यार्थ्यांना धोक्याची आगविमोचन, स्थलांतर जागा, व जखमींना मदत कार्य कसे याचे प्रात्यक्षिके दाखवून नैसर्गिक आपत्तीचे प्रशिक्षण दिले. त्यानंतर 11.40 वा. मॉक ड्रिलला सुरवात झाली. 12.10 ते 12.30 पर्यंत मॉकड्रिलचे रिपोर्टिंग झाले. त्यानंतर 12.30 ते 1.00 पर्यंत अग्निशमनद्वारे प्रात्यक्षिक विमोचन आणि फायर फायटींगचे प्रात्यक्षिक सराव प्रशिक्षण 'दिले. यामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेऊन सराव करून घेतला.

शाळेचे सभापती  श्री.मिलिंद टिपणीस, महाडचे नायब तह‌सिलदार श्री प्रदीप कुडळ, श्री.सुरेश खोपकर, नागरी संरक्षण दलाचे अधिकारी सहाय्यक उपनियंत्रक श्री.का.र.कुरकुटे, श्री.श.भा.शिरसाट, वरिष्ठ प्रशासकीय लिपिक श्री. वि.ग.पाटील, रिका इंडिया या संस्थेच्या पोग्रॅम मॅनेजर श्रीम.अंम्बिका डबराल, होमगार्ड डिपार्टमेंटचे अधिकारी रायगड जिल्हा प्रभारी केंद्रनायक श्री.गणेश कदम, तालुका समादेशक अधिकारी श्री.एस.एस.अंतुले, होमगार्डचे प्रफुल्ल जाधव, श्री.राजू पाटील, अग्निशामक दलाचे अधिकारी श्री.गणेश पाटील आणि त्यांची टीम, पंचायत समिती महाडचे प्रतिनिधी श्री.म्हात्रे, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ. स्वराली रोठ, शाळेतील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, परिसरातील पालकवर्ग, शाळेतील सर्व विद्यार्थी या सर्वांच्या उपस्थितीत शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे मॉक ड्रिल घेण्यात आले.

या संपूर्ण कार्यक्रमाची व्यवस्था व सूत्रसंचालन शाळेतील जेष्ठ सहाय्यक शिक्षक  ज्ञानदेव साळवे यांनी केली.  शालेय आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले शाळेतील सहाय्यक शिक्षक श्री.नरेश पाटील यांनी आपत्ती प्रात्यक्षिकाचे नियोजन केले आणि शेवटी उपस्थित सर्वांचे आभार मानले. अशा प्रकारे आपत्ती व्यवस्थापनाचे मॉक ड्रिल यशस्वीरित्या संपन्न झाले.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक