पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालयात पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबीर संपन्न

 

       

 

अलिबाग,दि.01 (जिमाका) : जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्हा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र " गरुडझेप" मार्फत, पेण येथील भाऊसाहेब नेने महाविद्यालय येथे पोलीस भरतीबाबत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमामध्ये पेण तहसिलदार श्रीमती स्वप्नाली डोईफोडे व नायब  तहसिलदार श्रीमती प्रज्ञा राजमाने यांनी  प्रशिक्षणार्थींना पोलीस भरतीच्या अनुषंगाने परीक्षेचे अर्ज ऑनलाईन भरणे, पुस्तकांची उपलब्धता, पोलीस भरती परीक्षेचा अभ्यासक्रम व शारिरीक क्षमता चाचणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे उपस्थित विद्यार्थ्यांना गरुडझेप स्पर्धा परीक्षा उपक्रम आणि गरुडझेप ॲपची माहिती तसेच हे ॲप डाऊनलोड कसे करावे, याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.

००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक