पी.एम किसान योजना व मतदान ओळखपत्रासोबत आधार लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभा संपन्न



अलिबाग, दि.26 (जिमाका):- जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाखाली व अलिबाग उपविभागीय अधिकारी प्रशांत ढगे आणि अलिबाग तहसिलदार मीनल दळवी यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग तालुक्यातील नागरिकांमध्ये पी.एम किसान (PM-KISAN) योजना व भारत निवडणूक आयोगाने राबविलेल्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत मार्गदर्शन करण्याकरिता अलिबाग तालुकत्यातील मौजे कुर्डूस येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले.

या विशेष ग्रामसभेचे औचित्य साधून ग्रामपंचायत कार्यालय, कुर्डूस येथे पोयनाड मंडल अधिकारी श्री.निकम व कुर्डूस तलाठी सत्यवान पाटील यांनी उपस्थित ग्रामस्थांना पी.एम किसान (PM-KISAN) योजना, ई-केवायसी करण्याबाबत माहिती दिली.

यावेळी भारत निवडणूक आयोगाद्वारे राबविण्यात येणाऱ्या मतदान ओळखपत्रासोबत आधारकार्ड लिंक करण्याबाबत माहिती देवून फॉर्म 6 ब भरून घेण्याची कार्यवाही करण्यात आली.

यावेळी कुर्डूस ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक