स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात उपलब्ध

 

अलिबाग,दि.25 (जिमाका):- भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना दर्शनिका विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांनी ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 हा ग्रंथ रायगड जिल्हयातील वाचकांच्या संदर्भासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग या कार्यालयात उपलब्ध करून दिला आहे.

      स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश खंड-2 या चरित्रकोशात मुंबई, ठाणे, पालघर व कुलाबा (आताचा रायगड जिल्हा) या जिल्हयातील स्वातंत्र्य सैनिकांचा अल्पपरिचय उपलब्ध करुन दिला आहे.

       या ग्रंथाच्या विस्तृत प्रस्तावनेत संपादक श्री. भ. ज. कुटे यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय चळवळीचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्रात स्वातंत्र्यासाठी जो लढा झाला त्याच्या विचार मंचनाची पार्श्वभूमी असलेल्या मवाळवाद, जहालवाद, क्रांतीवादी विचारसरणी सुधारणावाद, संविधानवाद या तत्वप्रणालीवर चर्चा केली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली उभारलेली स्वातंत्र्यचळवळ, 19 व 20 व्या शतकात उदयास आलेली ब्राम्हणेत्तर चळवळ, कामगार चळवळ, त्यातील नेते, भारतात यशस्वी होऊ न शकलेली साम्यवादी विचारसरणी याबाबींचे सखोल विवेचन श्री.कुंटे यांनी प्रस्तावनेत मांडले आहे.

     भारतीय स्वातंत्र्याचा हा इतिहास रायगड जिल्हयातील जास्तीत जास्त वाचक, अभ्यासक, संशोधक यांच्यापर्यंत पोहोचावा, या चारित्र्यकोशाची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी, म्हणून या कोशाची माहिती व छायाचित्र जिल्ह्यातील वाचकांच्या संदर्भ सेवेसाठी या ग्रंथाची प्रत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, डोंगरे हॉल येथे उपलब्ध आहे, असे प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, अजित ब.पवार यांनी कळविले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक