आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रम संपन्न

 

 

अलिबाग,दि.25 (जिमाका):- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा तसेच आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, वडाळा, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार (दि.23 ऑगस्ट ) रोजी  पी.एन.पी.कॉलेज अलिबाग येथे  जिल्हा शल्यचिकित्सक  डॉ.सुहास माने व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक श्री.संजय माने यांचे नियोजन व प्राचार्य डॉ.ओमकार पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवकांसमोरील आव्हाने व एड्स जनजागृतीपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

      यावेळी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक संजय माने यांनी एड्सविषयी मार्गदर्शन करताना एचआयव्ही म्हणजे काय, एड्स म्हणजे काय त्याची कारणे, लक्षणे आणि त्यावरील प्रतिबंधात्मक उपाय याविषयी शास्त्रीय व सविस्तर माहिती दिली. तसेच एचआयव्ही संसर्गित असणाऱ्या व्यक्तीला देण्यात येत असलेल्या एआरटी औषधोपचार तसेच प्रत्यकाने लैंगिक संबंधाविषयी नैतिक मूल्ये पाळली पाहिजेत,असेही सांगितले. त्यामध्ये लग्नापूर्वी ब्रम्हचर्य पाळा, लग्नानंतर श्रीराम बना तसेच हा रोग पूर्णपणे बरा होईल असे कोणतेही औषधोपचार उपलब्ध  नसल्यामुळे एचआयव्ही/ एड्स विषयी माहिती घेऊन प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे असल्याचे सांगून यावेळी युवकांच्या करिअरविषयी मार्गदर्शन केले. 

     या आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभागामार्फत हर घर तिरंगा  आणि एचआयव्ही/ एड्स या विषयावर Face Painting  स्पर्धा व Face  Reel  बनविणे या स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याकरिता आवाहनही करण्यात आले.

     या दोन्ही स्पर्धेकरिता अनुक्रमे प्रथम क्रमांक 500/-, द्वितीय क्रमांक 350/- व तृतीय क्रमांक 250/- अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पाटील यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात प्रा.रविंद्र पाटील  यांनी आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे महत्व व उद्देश स्पष्ट केला तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्याचा हेतू सांगितला. 

       या कार्यक्रमासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.रविंद्र पाटील, प्रा.पल्लवी पाटील, जिल्हा सहायक लेखा  श्री.रविंद्र कदम, पी.एन.पी. कॉलेज, शिक्षक प्रा.नितीश अगरवाल, प्रा.दिनेश पाटील, प्रा.विक्रांत वार्डे, जिल्हा रुग्णालयातील आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ अमित सोनवणे, समुपदेशक कल्पना गाडे, टी.बी. विभागाचे कीर्तिकांत पाटील, श्रीम.माधुरी पाटील, एचएलएलचे श्रीम.जुईली पाटील, एनजीओ प्रतिनिधी श्रीम.करुणा म्हात्रे, महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक