पोलादपूरच्या उत्तरवाहिनी सावित्री नदीपात्रात रिव्हर राफ्टिंगची ट्रायल नरवीर रेस्क्यू टिमचा उपक्रम

 


 

अलिबाग,दि.24 (जिमाका) :- जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील रानबाजिरे धरणापासून लोहारे तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची आज ट्रायल घेण्यात आली.

               यावेळी कोलाडचे महेश सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचरचे अध्यक्ष रामदास कळंबे, जयेश जगताप, विक्रम भिलारे, दिपक उतेकर, सुमित दरेकर व टिमचे सदस्य उपस्थित होते.

               पोलादपूर तालुक्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार मिळावा तसेच पर्यटन स्थळांचा विकास करण्यासाठी नरवीर रेस्क्यू अँड ॲडव्हेंचर यांच्या माध्यमातून चळवळ सुरू करण्यात येत आहे. यानुषंगाने रानबाजिरे धरण ते लोहारमाळ तुर्भे पुलापर्यंत रिव्हर राफ्टिंगची ट्रायल रन घेण्यात आली असल्याचे यावेळी रामदास कळंबे यांनी सांगितले.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक