जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत

 


 

अलिबाग,दि.26 (जिमाका):-   आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून दि.8 मार्च 2022 रोजी नारी शक्ती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार ज्या महिला, संस्था यांनी  महिलांच्या कल्याणाकरिता, विकासाकरिता उल्लेखनीय कार्य केले आहे, अशा महिलांच्या सन्मानार्थ नारी शक्ती पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरिता उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्था यांनी केंद्र शासनाच्या www.awards.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याची तसेच नामनिर्देशनाची यापूर्वीची तारीख वाढविली असून आता दि.31 ऑक्टोबर 2022 पर्यंत अर्ज भरावयाचे आहेत.

       त्यासाठी जिल्ह्यातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिला व संस्थांनी नारी शक्ती पुरस्कारासाठी दिलेल्या विहित मुदतीत आपले अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनीत म्हात्रे यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक