जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि.06 सप्टेंबर रोजी

 


अलिबाग,दि.25 (जिमाका):- शासनाच्या दि.26 सप्टेंबर 2012 च्या परिपत्रकानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. तथापि पहिल्या सोमवारी, दि. 5 सप्टेंबर 2022 रोजी जिल्हाधिकारी, रायगड यांच्याकडून गौरी विर्सजनानिमित्त स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे माहे सप्टेंबर 2022 मध्ये होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन मंगळवार, दि. 06 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 1.00 वा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व  सभागृहात होणार आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कळविले आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक