पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा दौरा

 


 

अलिबाग,जि.रायगड दि.09 (जिमाका) :- राज्याच्या उद्योग आणि खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे यांचा जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे..

शुक्रवार दि.09 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.45 वा. सुनिती शासकीय निवासस्थान मुंबई येथून शासकीय वाहनाने कळंबोली ता.पनवेलकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. कळंबोली ता.पनवेल येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ : मनपा सभागृह, कळंबोली, ता.पनवेल.  सायंकाळी 4.00 वा . पनवेल येथून शासकीय वाहनाने कर्जतकडे प्रयाण. सायंकाळी 5.00 वा. कर्जत येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ :राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दहिवली, कर्जत. मुक्काम :कर्जत.

शुक्रवार दि.10 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वा. कर्जत येथून शासकीय वाहनाने खोपोलीकडे प्रयाण. सकाळी 11.00 वा. खोपोली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ : चंद्रविलास हॉल, खोपोली. दुपारी 12.30 वा.राखीव. दुपारी 1.00 वा. खोपोली येथून शासकीय वाहनाने पेणकडे प्रयाण. दुपारी 2.00 वा. पेण येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ : महात्मा गांधी मंदिर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, पेण. दुपारी 3.00 वा. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतून सुशिक्षित बेरोजगारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध होण्याबाबत कार्यक्रम शुभारंभ. स्थळ : रामसिता कॉम्प्लेक्स, देवआळी, अंबिका मंदिराजवळ, पेण.  दुपारी 3.30 वा. पेण येथून शासकीय वाहनाने पाली ता.सुधागडकडे प्रयाण. सायंकाळी 4.45 वा. पाली येथे आगमन व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांसमवेत चर्चा. स्थळ :गुजराती हॉली, पाली.  सोईनुसार पाली येथून शासकीय वाहनाने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक