माणगाव येथे विभागीय क्रीडा संकुल उभारणीसाठी क्रीडा विभागाकडून प्रशासकीय मान्यता प्रदान पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या प्रयत्नाने क्रीडा संकुल स्थापण्याची प्रक्रिया शीघ्र गतीने

 


 

अलिबाग,जि.रायगड, दि.1 (जिमाका):- कोकण विभागाचे विभागीय क्रीडा संकुल नवी मुंबई येथे उभारण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. परंतु नवी मुंबई परिसरात या संकुलासाठी आवश्यक शासकीय जागा उपलब्ध होणे शक्य न झाल्याने  क्रीडा राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांच्या कल्पनेतून विभागाचे क्रीडा संकुल मध्यवर्ती झाल्यास कोकण विभागातील सर्वच खेळाडूंना याचा लाभ होईल, असा विचार पुढे आला.  त्यानुषंगाने पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केलेल्या अखंडित पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील मौजे नाणोरे येथे  विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

            मौजे नाणोरे येथील क्रीडा संकुलासाठी स.नं.130/0 मधील 10.00 हेक्टर (24 एकर) शासकीय जागा विभागीय क्रीडा संकुल, कार्यकारी समिती, मुंबई विभागाच्या नावावर करण्यात आली आहे. या संकुलासाठी रुपये त्र्याऐंशी कोटी चव्वेचाळीस लक्ष सोळा हजार रकमेच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाने मान्यता दिली आहे.

            शासनाच्या मान्यताप्राप्त अंदाजपत्रकानुसार विभागीय क्रीडा संकुलामध्ये 400 मी.सिंथेटीक धावनपथ, फुटबॉल मैदान, ॲथलेटिक्स पॅव्हेलियन बिल्डिंग, हॉकी मैदान चेंजिग रूमसह, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, खो-खो, कबड्डी मैदाने, टेनिस कोर्ट, चेंजिंग रुप, आऊटडोर गेम, अंतर्गत रस्ते, इनडोअर हॉल, जलतरण तलाव, डायव्हींग तलाव, संरक्षण भिंत, मुले-मुली वसतिगृहे, रेन वॉटर हार्वेस्टिग व बोअरवेल, फिल्टरेशन प्लँट, जलतरण व डायव्हींग तलाव, मटेरियल टेस्टींग ॲन्ड रॉयल्टी चॉर्ज, जीएसटी, विद्युतीकरण, पाणी व्यवस्था, क्रीडांगण समपातळीकरण व इतर सुविधायुक्त बाबींचा यामध्ये समावेश आहे.

कोकण विभागात मुंबई ते सिंधुदूर्ग या परिसरातील अनेक खेळाडूंना रायगड जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या या क्रीडा संकुलामुळे विविध खेळांमध्ये प्राविण्य मिळविण्यास नक्कीच सहाय्य होईल, असा विश्वास राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला आहे.

0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक