“अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रविकास कार्यक्रम” योजनेंतर्गत श्रीवर्धन व माणगाव नगरपंचायत अंतर्गत कामांसाठी रु.50 लक्ष निधी वितरणास शासनाची मंजूरी

 


अलिबाग,जि.रायगड,दि.1 (जिमाका):- राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम राबविण्यासाठी अनुदान वितरीत करण्यास शासनाने मंजूरी दिली असून त्यात जिल्ह्यातील श्रीवर्धन व माणगाव येथील प्रस्तावित कामांचा समावेश आहे.  

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याकडे राज्यमंत्री तथा पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या कामांना मंजूरी देऊन निधी उपलब्ध करणेबाबत मागणी केली होती.  त्यानुसार जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील नगरपंचायत अंतर्गत नूर मस्जिद कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे व माणगाव येथील नगरपंचायत अंतर्गत मोहल्ला कब्रस्तान संरक्षक भिंत बांधणे, या कामांसाठी शासनाकडून प्रत्येकी रू. 25 लक्ष असे एकूण 50 लक्ष इतके अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

अल्पसंख्याक विकास विभागाने सन 2008-09 पासून राज्यातील अल्पसंख्याक बहुल नागरी क्षेत्रात क्षेत्रविकास कार्यक्रम कार्यान्वित केला आहे. या योजनेंतर्गत खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांच्याकडून महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत यांच्या प्राप्त प्रस्तावांना मंजूर देवून निधी वितरीत करण्यात येतो.  या अंतर्गत खासदार, आमदार व जिल्हाधिकारी यांच्या प्रस्तावांना महानगरपालिका/नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात कामांच्या संख्येची मर्यादा एकापेक्षा जास्त परंतु प्रति काम प्रति वर्षी महानगरपालिकेस कमाल रु.40 लक्ष, अ वर्ग नगरपालिकेस कमाल रु.30 लक्ष, ब वर्ग नगरपालिकेस व क वर्ग नगरपंचायतीस कमाल रु.20 लक्ष रुपये निधी देण्याची तरतूद आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक