ग्रामंपचायत निवडणूक : मतदानासाठी 26 रोजी स्थानिक सुट्टी




अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.15-  माहे ऑक्टोंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 या कालावधीत मुदत संपणाऱ्या  व नव्याने अस्तित्वात आलेल्या ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूकांसाठी तसेच सरपंच पदासाठी थेट निवडणूकीद्वारे भरण्यात येणाऱ्या रिक्त पदांच्या पोट निवडणूकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये 121 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 1 ग्रामपंचायतीची सरपंच पदाच्या पोट निवडणूकीसाठी बुधवार दि.26रोजी मतदान होणार आहे. त्या अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्षेत्रात दि. 26 रोजी मतदानाच्या दिवशी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक