जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.48 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,जि. रायगड
(जिमाका)दि.31- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 3.48 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1
जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2239.59
मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षातून
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 2.00 मि.मि., पेण-4.00
मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-5.80 मि.मि., उरण-3.00 मि.मि., कर्जत-1.90
मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि., रोहा-3.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-3.00 मि.मि., महाड-3.00 मि.मि., पोलादपूर-1.00 म्हसळा-3.00 मि.मि.,
श्रीवर्धन-2.00 मि.मि., माथेरान-19.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 55.70
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.48 मि.मि. इतकी आहे.
एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 71.26 टक्के इतकी
आहे.
00000
Comments
Post a Comment