उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम रविवारी


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.2-  उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यात राबविण्यात येणार आहे.   या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना रविवारी दि. 5 रोजी पोलीओचा डोस देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा  ही मोहिम राबविण्यासाठी सज्ज झाली आहे.  या मोहिमेसाठी ग्रामीण भागातील 16 प्राथमिक आरोग्य केंद्र त्याचप्रमाणे शहरी भागात बुथ उभारण्यात येणार असून प्रत्येक बुथवर रविवार दि.5 रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळात 0 ते 5 वर्षे वयोगटातील सर्व बालकांना  पोलिओचा डोस देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पनवेल,उरण,कर्जत,खालापूर या चार तालुक्यातील ग्रामीण व शहरी  भागातील अपेक्षित लाभार्थी एक लाख 73 हजार 359 असून ग्रामीण भागात 1059 आणि शहरी भागात 166 असे एकूण 1225 बुथवर डोस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.  या व्यतिरिक्त रेल्वे स्थानक, इ. गर्दीच्या ठिकाणी सूद्धा लस देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मोहिमेसाठी 3026 आरोग्य कर्मचारी  नेमण्यात आले असून अंगणवाडी सेविका, शिक्षक तसेच खाजगी संस्थांचा देखील सहभाग आहे. 0 ते 5 वर्षे वयोगटातील बालकांना पोलीओ सारख्या रोगापासून संरक्षण करण्यासाठी या लसीचा डोस देणे अत्यंत आवश्यक आहे. तरी सर्व  पालकांनी आपल्या 5 वर्षाखालील बालकांना डोस पाजून या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक