राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्प : अलिबाग भुमिगत विद्युत प्रणालीबाबत शनिवारी सार्वजनिक सभा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.7- राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरात भूमिगत विद्युत प्रणाली राबविण्यात येणार आहे. या संदर्भात लोकप्रतिनिधी व विविध समाजघटकांना माहिती व्हावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवार दि. 10 रोजी सकाळी 11.00 वाजता सार्वजनिक सभा बोलावण्यात आली आहे. याबाबत जिल्हा आपत्ती निवारण कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार जागतिक बँक व भारत सरकार अर्थ सहायित राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत अलिबाग शहरातील सध्याची कार्यरत विद्युत प्रणाली भूमिगत करण्याच्या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी पुढील काही दिवसात करण्यात येणार असून  या प्रकल्पाची माहिती नागरिकांना व्हावी, तसेच या योजनेची अंमलबजावणी करतांना रहिवाशांना, व्यावसायिकांना तसेच सामान्य जनतेला होणारे अडथळे,गैरसोई इ.बाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी शनिवार  दिनांक  10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता राजस्व सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालयात सार्वजनिक सभेचे आयोजन करण्यात आले आहे.
            या सभेसाठी सर्व लोकप्रतिनिधी तसेच अलिबाग शहरातील सर्व कार्यालयांचे प्रमुख अधिकारी,व्यापारी असोशिएशनचे प्रतिनिधी,पेट्रोलपंप,बँक,हॉटेल असोशिएशनचे प्रतिनिधी ,शाळा व्यवस्थापन प्रतिनिधी, शहर वाहतूक, रिक्षासंघटनांचे प्रतिनिधी, गृहनिर्माण सहकारीसंस्थांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, नागरिक, पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक, दूरध्वनी इ. सार्वजनिक सुविधांचे कार्यालय प्रमुखांनी या सार्वजनिक सभेस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड अलिबाग यांनी केले आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक