पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा



अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.10:-राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री ना. रविंद्र चव्हाण हे  रविवार, दि.11 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे-
रविवार दि.11 रोजी सकाळी 11 वा. महाड येथे आगमन व  क्रांती दिनानिमित्त चवदार तळे व क्रांतीस्तंभ पाहणी.  दुपारी 12 वा.  महाड क्रांतीदिना निमित्त पूर्व तयारीबाबत बैठक, तसेच  दुपारी एक वा. महाड क्रांतीदिनानिमित्त कायदा व सुरक्षा संदर्भात बैठक. (स्थळ:डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, महाड). दुपारी दोन वाजता श्री.रवि कुलकर्णी, महाड यांच्या निवासस्थानी भेट. सायं.चार वाजता महाड येथून गोरेगांव, ता.माणगांवकडे प्रयाण. सायं. सहा वाजता गोरेगांव,ता.माणगांव येथे आगमन व पद्मश्री पुरस्कार सन्मानीत श्री. मनोज जोशी यांच्या नागरी सत्कार समारंभास उपस्थिती. स्थळ: जिजामाता मैदान, गोरेगांव, ता.माणगांव जि.रायगड. सायंकाळी साडेसात वाजता गोरेगांव, ता. माणगांव येथून पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण.
०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक