लोकशाही दि: तक्रारींचे निराकरण वेळीच करा- जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांचे निर्देश



        अलिबाग,जि. रायगड दि.5- लोकशाही दिन, आपले सरकार वेब पोर्टल या सारख्या अधिकृत व्यासपीठावर सामान्य जनतेकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी कटाक्षाने प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांनी आज येथे दिले.
दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणाऱ्या लोकशाही दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे,  अपर पोलीस अधिक्षक संजयकुमार पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) चंद्रकांत वाघमारे आदि उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी  लोकशाही दिनानिमित्त आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला. तसेच आपले सरकार या वेवपोर्टलवर जिल्ह्यातून झालेल्या तक्रारींचाही आढावा घेतला. ज्या ज्या विभागाशी संबंधित तक्रार असेल त्या विभागाने तात्काळ त्या तक्रारीची दखल घ्यावी व पुर्तता करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी दिले.
 लोकशाही दिनात आज एकूण 6 अर्ज प्राप्त झाले. त्यात महसूल विभाग-4, मुख्याधिकारी कर्जत नगरपरिषद -1, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख-रायगड 1 अर्जांचा समावेश आहे.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक