जागतिक महिला दिन कार्यक्रम : मतदानातही महिलांनी सहभाग वाढवावा निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांचे आवाहन


अलिबाग,जि. रायगड (जिमाका) दि.8:- लोकशाही बळकट करण्यासाठी महिलांनी मतदानात जास्तीत जास्त सहभाग द्यावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी आज केले. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे 8 मार्च महिला दिना निमित्त महिला मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व तहसिल कार्यालयाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती. लता गुरव, अलिबाग तहसिलदार  प्रकाश संकपाळ, निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती. सुरेखा घुगे,  जिल्हा युथ आयकॉन तपस्वी गोंधळी, दयानंद देसाई व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
मतदानाचा हक्क साऱ्यांनीच बजावलाच पाहिजे, मतदानाची आकडेवारी जास्तीत जास्त कशी वाढेल याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे असे सांगून श्री.पाणबुडे यांनी उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अलिबाग तहसिलदार  प्रकाश संकपाळ, जिल्हा युथ आयकोन श्रीमती. तपस्वी गोंधळी जिल्हाधिकारी कार्यालयातील श्रीमती दर्शना पाटील यांनीही मार्गदर्शन केले.
श्री.पाणबुडे यांच्या हस्ते महिलांना मतदान ओळखपत्र आणि गुलाबपुष्प देण्यात आले. त्याच बरोबर नवीन मतदार नोंदणी करिता महिलांकडून नमुना नंबर 6 चे अर्ज स्विकारण्यात आले.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक