दर्जेदार सेवा हा ग्राहकांचा हक्क-विजयशेवाळे


अलिबाग,जि.रायगड,दि.27(जिमाका)-ग्राहकांना चांगल्या व दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी ग्राहकांच्या हितासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यात येते. ग्राहकांना दर्जेदार सेवा मिळावी हा त्यांचा हक्कआहे. यासाठी त्यांच्या तक्रारींचे निराकरण होणे आवश्यक असून त्यासाठी ग्राहक चळवळीतील शासकीय व अशासकिय सदस्यांनी प्रभावीपणे काम करण्याची गरजआहे,असे प्रतिपादन जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्यक्ष विजय शेवाळे यांनी केले. 
राष्ट्रीय ग्राहक दिन येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा पुरवठा विभागाच्यावतीने आज साजरा करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबूडे, उल्का पावसकर, जिल्हा पुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे, सहा जिल्हा  पुरवठा अधिकारी सुरेंद्र ठाकूर, नायब तहसीलदार तथा प्रभारी पुरवठा निरीक्षण अधिकारी संदीप पाणमंद,  अन्न व औषध प्रशासन सहाय्यक आयुक्त दिलीप संगत, वैद्यमापन शास्त्र सहाय्यक नियंत्रक सिताराम कदम, पुरवठाअधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सत्यवान कांबळेआदीउपस्थितहोते.
यावेळी शेवाळे यांनी सांगितले की, अन्न औषध प्रशासन विभागाकडे प्राप्त तक्रारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. बहुतांश ठिकाणी वजन मापे प्रमाणित करून घेतली जात नाही. त्याकडे लक्ष देणेआवश्यकआहे. ऑनलाईन माध्यमातून होणऱ्या खरेदी मधूनअनेकदा ग्राहकांची फसवणूक होते.त्याबाबत जनजागृती करणे आवश्यक आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरणपाणबुडे म्हणाले की, ग्राहक संरक्षण कायदा 2018 मध्ये बऱ्याचशा सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऑनलाईन  खरेदी व विक्री होणारी फसवणूक, मॉल, सुपर मार्केट मध्ये होणार्‍याग्राहकांच्या लुबाडणुकीबाबत सुधारणा झाल्याने ग्राहकांना न्याय मिळत आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हापुरवठा अधिकारी लिलाधर दुफारे यांनी केले. या कार्यक्रमास अधिकारी, कर्मचारी, सदस्य, तसेच ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक