पत्रपरिषद : उद्यापासून (दि.28 डिसेंबर) कामोठे येथे रायगड जिल्हा कृषि महोत्सव



अलिबाग, जि. रायगड (जिमाका) दि.26:- रायगड जिल्ह्याचा कृषि महोत्सव दिनांक 28 ते 31 डिसेंबर या कालावधी खांदेश्वर रेल्वे स्टेशन, सेक्टर क्र. 29, कामोठे, ता. पनवेल, जि. रायगड येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा आत्मा प्रकल्प संचालक पांडुरंग शेळके यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
रायगड जिल्हा कृषि महोत्सवाच्या आयोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेस जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालय व आत्मा प्रकल्प उपसंचालक मदन मुकणे  यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी माहिती देण्यात आली कि, बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कृषि विस्ताराला अनन्यसाधारण महत्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दींगत होऊ शकतो. आधुनिक कृषि तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थीक दृष्ट्या उन्नत होऊन जागतीक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिद्ध करू शकतील. शेतकऱ्यांना शासनाच्या विविध कृषि योजना/उपक्रमांची माहिती, संशोधित कृषि तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोगशील शेतकऱ्यांचे अनुभव, बाजारपेठ व्यवस्थापन, कृषि पूरक व्यवसाय इत्यादीबाबतचे मार्गदर्शन उपलब्ध होईल. सदर महोत्सवामध्ये कृषि प्रदर्शन, कृषि विषयक परिसंवाद आणि अनुभवी शेतकरी/उद्योजकांची व्याख्याने, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री या संकल्पनेवर आधारीत धान्य व खाद्य महोत्सव तसेच फळे, फुले व भाजीपाला महोत्सव इत्यादीचे आयोजन करण्यात येणार आहे.
                 या महोत्सवाचे उद्दिष्ट्य कृषि विषयक विकसीत तंत्रज्ञान शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे,शेतकरी-शास्त्रज्ञ आणि संशोधन-विस्तार-शेतकरी-विपणन साखळी सक्षमीकरण, समुह/गट संघटीत करून स्थापीत शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा शेतमाल मिळावा या करीता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसीत करणे,कृषि विषयक परिसंवाद/व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाण-घेवाणीद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता-खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषि उत्पादनास आणि विपणनास चालना देणे, शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण    करणे हे आहेत.
कृषि महोत्सवाचे स्वरूप-
या महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे बंदरे,वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होईल. उद्घाटन सोहळ्यास  केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री ना. अनंत गिते, कृषि फलोत्पादन,पणन पाणीपुरवठा व स्वच्छता रज्यमंत्री सदाशिव खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष आदितीताई तटकरे, सिडकोचे अध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकूर, लोकसभा सदस्य  खा.श्रीरंग बारणे, विधान परिषद सदस्य आ.जयंत पाटील,आ.निरंजन डावखरे,आ. बाळाराम पाटील, आ.अनिकेत तटकरे तसेच विधानसभा सदस्य आ.श्री.सुभाष पाटील, अलिबाग,आ.सुरेश लाड,कर्जत,आ.भरत गोगावले महाड, आ.धैर्यशील पाटील, पेण, आ.मनोहर भोईर, उरण, आ.अवधूत तटकरे, महापौर पनवेल महानगरपालिका डॉ.कविता चौतमोल, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर, संचालक आत्मा पुणे,अनिल बनसोडे, विभागीय कृषि  सहसंचालक ठाणे विकास पाटील आदी मान्यवर उपस्थित राहतील.
 या महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी पणन मंडळाच्या योजना, निसर्गचक्रानुसार सेंद्रिय शेती विषयांच्या परिसंवादाचे आयोजन,तिसऱ्या दिवशी शेततलावातील मत्स्य व्यवसाय, खारभूमी व्यवस्थापन विषयांच्या परिसंवादाचे आयोजन, चौथ्या दिवशी आंबा पुनर्जीवन व पिक संरक्षण विषयाच्या परिसंवादाचे आयोजन व समारोपीय कार्यक्रम. या प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रम रुपरेषा  व चर्चासत्र,परिसंवाद कार्यक्रम:
शुक्रवार दि.28 डिसेंबर रोजी दुपारी तीन वा.उद्घाटन समारंभ.  शनिवार दि. 29 डिसेंबर सकाळी अकरा वा. पणन मंडळाच्या योजना व्यवस्थापक,महाराष्ट्र राज्य पणन मंडळ पुणे. डॉ.भास्कर पाटील.    दुपारी एक वा. निसर्गचक्रानुसार सेंद्रिय शेती  सेंद्रिय शेती तज्ज्ञ,खानू जि.रत्नागिरी संदिप कांबळे.    रविवार दि. 30 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वा. शेततलावातील मत्स्यव्यवसाय शास्त्रज्ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र रोहा डॉ.विवेक वर्तक.  दुपारी एक वा.खारभूमी व्यवस्थापन शास्त्रज्ज्ञ खारभूमी संशोधन केंद्र पनवेल डॉ.एस.बी.दोडके.  सोमवार दि. 31 डिसेंबर रोजी सकाळी अकरा वा. आंबा पुर्नजिवन व पिक संरक्षण शास्त्रज्ज्ञ, कृषि विज्ञान केंद्र रोहा डॉ.राजेश मांजरेकर.  दुपारी चार वा.समारोप कार्यक्रम.
या महोत्सवात कृषि प्रदर्शन हा महत्वाचा घटक आहे. यामध्ये कृषि व कृषि संलग्न विभाग, कृषि विद्यापीठे, कृषि विज्ञान केंद्र यांची दालने, विविध कंपन्यांची दालने, खाद्य पदार्थांचे स्टॉल, प्रात्यक्षिके तसेच शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा समावेश आहे. तसेच कृषि महोत्सवामध्ये परिसंवादाकरिता स्वतंत्र कक्षाची उभारणी केलेली आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या, तीसऱ्या व चौथ्या दिवशी जिल्ह्यातील हवामान, पिक पद्धती, कृषि प्रक्रिया उद्योग व पूरक व्यवसाय या विषयीच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या/प्रक्रिया केलेल्या दर्जेदार शेतमालाची विक्री शृंखला विकसीत करण्यासाठी दालने उपलब्ध करून देण्यात आली आहेत, तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी व कृषि प्रक्रिया उद्योगांनी सदर कृषि महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकल्प संचालक (आत्मा) पांडुरंग शेळके व उपसंचालक मदन मुकणे यांनी केले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक