आढावा बैठक प्रदूषणाबाबत उपाययोजना करतांना स्थानिक रहिवाशांचा सहभाग घ्या- ना.पोटे



            अलिबाग, जि. रायगड,दि.3 (जिमाका)-  रासायनिक कंपन्यांमुळे होत असलेल्या प्रदूषणाबाबत उपाययोजना करताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश राज्याचे उद्योग व खनिकर्म, पर्यावरण आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री ना. प्रवीण पोटे यांनी आज येथे आयोजित आढावा बैठकीत दिले. ना. पोटे हे आज जिल्हा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी त्यांच्या अखत्यारीतील विभागांची आढावा बैठक घेतली.
शासकीय विश्रामगृह अलिबाग येथे ही बैठक पार पडली. यावेळी सार्वजनिक बांधकाम, उद्योग, पर्यावरण, औद्योगिक विकास महामंडळ विभागांचा आढावा घेण्यात आला.
            यावेळी अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कोकण भवन, जी.एस.मोहिते, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल एस.एन. कांबळे, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाड विश्वनाथ सातपुते, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी डॉ.हर्षवर्धन जाधव, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ रोहा चे उपअभियंता एम.एस.जाधव, महाव्यवस्थापक उद्योग केंद्राचे श्री.पाटील आदि  उपस्थित होते.
            यावेळी बैठकीत मंत्री महोदयांनी जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होत असलेल्या रस्त्यांच्या कामांबाबत आढावा घेतला.   रस्त्यांची कामे करताना अधिकारी वर्गाने ती कामे चांगल्या पध्दतीने करावीत व  नागरिकांना उत्तम दर्जाचे रस्ते देता येतील याची दक्षता घ्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.   तसेच रोहा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या केमिकल कंपनीमुळे होत असलेल्या प्रदूषणांबाबतही आढावा घेऊन  तेथे होत असलेल्या प्रदूषणाबाबत योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.  अधिकारी वर्गानी प्रदूषणाबाबत करावयाच्या उपाययोजना करत असताना स्थानिकांचा सहभाग घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
०००००


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक