प्रधानमंत्री पिक विमा योजना: शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यास बॅंकांसाठी 14 पर्यंत मुदत

            अलिबाग, जि. रायगड, दि.7 (जिमाका)-  प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2017 मध्ये राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती संबंधित बँकांनी केंद्र शासनाच्या www.agri-insurance.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करणे बंधनकारक करण्यात आले आहे. हे संकेतस्थळ 14 ऑक्टोंबर, 2017 पर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर शेतकरी सहभागाची माहिती अपलोड करता येणार नाही. संकेतस्थळावर अपलोड झालेल्या शेतकरी सहभागाची माहिती फक्त केंद्र व राज्य शासनाचे विमा हप्ता अनुदान अदा करण्यास ग्राह्य धरले जाणार असून त्यानुसार संबंधित विमा कंपनीकडून सुध्दा नुकसान भरपाईसाठी विचारात घेतली जाणार आहे. तरी सर्व संबंधित बँकानी योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांची माहिती 14 ऑक्टोंबर, 2017 पूर्वी संकेस्थळावर अपलोड करावी. असे आवाहन कृषि विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.  

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक