युवकांनी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे जिल्हयामध्ये 14 ठिकाणी उद्धाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न

 


 

रायगड (जिमाका),दि.19:- आगामी काळात जिल्ह्यात वाढत्या उद्योग क्षेत्रामुळे रोजगाराच्या मोठ्या प्रमाणात संधी निर्माण होणार आहेत. यासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे.  प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी केले.

 महाराष्ट्र शासनामार्फत जिल्हयातील 14 गावांमध्ये  प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्यातील या केंद्रांचे उद्धाटन आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्यप्रणालीद्वारे  झाले. यनिमित्ताने अलिबाग तालुक्यातील चेंढरे ग्रामपंचायत केंद्र येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व युवक यांच्याशी सवांद साधताना डॉ.म्हसे बोलत होते.

यावेळी उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाणतहसिलदार विवेक पाटीलजिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त श्रीमती अमिता पवारशिक्षणाधिकारी श्रीमती पुनिता गुरवजिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे  तसेच विविध विभागांचे प्रमुख शासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

ग्रामीण भागातील युवक युवतींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारस्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देणे आणि  मनुष्यबळाला कौशल्यपूर्ण बनविण्यासाठी जिल्हयातील 14 ग्रामपंचायतीमध्ये  प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राची सुरूवात करण्यात आली आहे. यामध्ये  रोह्यामधील धाटावपनवेल तालुक्यातील करंजाडेअलिबाग तालुक्यातील चेंढरेउरण मधील फुंडेपोलादपूर येथील तुर्भे बुद्रुकपेण मधील वडखळसुधागड तालुक्यातील जांभुळपाडा, मुरूड येथील नांदगावतळा तालुक्यातील मजगावमहाड मधील शिरवलीमाणगाव मधील रातवडखालापूर तालुक्यातील नारंगीश्रीवर्धन येथील दिघी आणि म्हसळा तालुक्यातील खरसई या ग्रामपंचायतीच्या ठिकाणाचा समावेश आहे. प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्धाटन कार्यक्रमास जिल्हयातील सर्व केंद्रावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पनवेल तालुक्यातील करंजाडे येथे आयोजित  कार्यक्रमास आमदार प्रशांत ठाकूर व विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर तर रोहा येथे आयोजित कार्यक्रमास आमदार अनिकेत तटकरे व उपविभागीय अधिकारी ज्ञानेश्वर खुटवड उपस्थित होते. यासह जिल्हयातील उर्वरीत केंद्रावर उपविभागीय अधिकारीतहसिलदारस्थानिक अधिकारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.   महाराष्ट्रातील 350  तालुक्यातील 511 ठिकाणी प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचे उद्घाटन झाले असून या सर्व कौशल्य विकास केंद्रावर पुढील 3 वर्षाच्या कालावधी मध्ये 18 ते 45 वयोगटातील व्यक्तींसाठी  कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता विभागामार्फत मोफत कौशल्य प्रशिक्षणे देण्यात येणार आहेत.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक