सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील सामाजिक न्याय विभागाच्या पाली-सुधागड येथील मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश प्रक्रिया सुरु

 

 

 

रायगड,दि.16(जिमाका):- सामाजिक न्याय विभागांतर्गत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, हे मधली आळी, राम मंदिर रोड तळ्याशेजारी ता.पाली-सुधागड, जि.रायगड येथे कार्यरत आहे.

या वसतिगृहामध्ये इ.8 वी पासून प्रवर्गनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे आहे. अनु.जाती 80 टक्के, अनु.जमाती 3 टक्के, विमुक्त जाती व भटक्या जमाती 5 टक्के, आर्थिक मागास व इतर मागासवर्गीय दारिद्र रेषेखालील कुटूबांतील विद्यार्थींनी 5 टक्के, विशेषमागास प्रवर्ग 2 टक्के, अनाथ 2 टक्के, अपंग 3 टक्के.

या वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश दिला जातो.  वसतिगृहात विद्यार्थींनींकरिता मोफत निवासव्यवस्था आहे. वसतिगृहात विद्यार्थीनींकरिता मोफत निवासव्यवस्था असून नाष्टा दररोज पोहे/शिरा/उपीट इ. पैकी एक,उकडलेली दोन अंडी, सफरचंद, आणि ऋतुमानानुसार एक फळ व दूध तसेच  भोजन व्यवस्थेमध्ये जेवण ( डाळ, भात, चपाती, भाजी/ उसळ, लोणचे, पापड इ.सह आठवडयातून दोन वेळा मासांहार ) देण्यात येतो.

वसतिगृहात 8 वी ते 10 वी च्या प्रवेशितांना अभ्यासाकरिता लागणारी वह्या, पुस्तके, शैक्षणिक व लेखन साहित्य देखील  विनामुल्य पुरविले जाते. तसेच 11 वी पासून पुढील इयत्तेत शिकणाऱ्या प्रवेशितांना रु.4 हजार वार्षिक शैक्षणिक साहित्य खरेदी भत्ता देण्यात येतो.  तसेच दैनंदिन व वैयक्तिक खर्चाकरिता म्हणून रु.600/- निर्वाहभत्ता दिला जातो.  शालेय व गणवेष पात्र विद्यार्थींनींना दोन संचाकरिता गणवेष भत्ता, रेनकोट, छत्री भत्ता दिला जातो. हे भत्ते त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येतात. या व्यतिरिक्त संगणक, ग्रंथालय सुविधा, क्रिडासाहित्य, मनोरंजन इ. अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

प्रवेशपात्र विद्यार्थीनींच्या पालकांचे सर्व मार्गानी मिळून रुपये 2  लाख 50 हजारचे आत, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रर्वग, विद्यार्थीनींकरिता रुपये 1 लाख 50 हजारच्या आत असावे.

ऑनलाईन प्रवेश अर्जासोबत तहसिलदार यांच्या सहीचा सन 2023-24 मधील उत्पन्नाचा दाखला, जातीचे मुलकी अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र,  मागील इयत्ता पास झाल्याचे गुणपत्रक, शाळा सोडल्याचा दाखला, बँक खाते पासबूक, रहिवासी दाखला, पासपोट आकाराचे दोन छायाचित्र, आधारकार्ड या कागदपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहेत.

सन 2024-25 या शैक्षणिक वर्षाकरिता वसतिगृह प्रवेश अर्ज हे वसतिगृहात विनामूल्य उपलब्ध करण्यात आले आहेत. अधिक माहितीकरिता गृहपाल, मागासवर्गीय व आर्थिकदृष्टया मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, पाली-सुधागड श्रीमती एम.जे.नरहरे यांच्याशी कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपाल एस.एफ. कदम यांनी केले आहे.

०००००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड